शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

‘समाज गौरव’ पुरस्काराने समाजभूषणांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:44 IST

विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ब्राह्मण समाजातील समाजभूषणांना अखिल ब्राह्मण मध्यवर्ती आणि समाज सहायक संस्थेच्या वतीने समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नाशिक : विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ब्राह्मण समाजातील समाजभूषणांना अखिल ब्राह्मण मध्यवर्ती आणि समाज सहायक संस्थेच्या वतीने समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे समाजोपयोगी कार्य नक्कीच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शंकराचार्य संकेश्वर पीठाचे श्री विद्यानृसिंह भारती यांनी केले.  ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिकच्या ४६व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी (दि.२५) समाजातील धार्मिक, कृषी, शिक्षण, अंतराळ-विज्ञान व संशोधन आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया व समाजभूषण ठरलेल्या व्यक्तींना ‘समाज गौरव पुरस्कार’ सन्मानपूर्वक शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून दीपक करंजीकर, संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. गणेश गोखले, विनायक जाधव महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जाधव म्हणाले, ब्राह्मण समाज धार्मिक परंपरेनुसार चालणारा समाज आहे. देवाजवळ सर्वांत अग्रस्थानी असलेला हा ब्राह्मण समाज परिपूर्ण अद्भुत असा वर्ण आहे. प्रास्ताविक उदयकुमार मुंगी यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष सबनीस यांनी केले, तर मानपत्राचे वाचन मिलिंद गांधी यांनी केले व आभार चंद्रशेखर जोशी यांनी मानले.यावेळी भारती यांनी समाजाला उद्देशून बोलताना सांगितले समाज गौरव पुरस्कार हा स्तुत्य उपक्रम असून, संस्थेच्या कार्य उत्तरोत्तर असेच प्रगती करत राहो, दरम्यान, त्यांच्या हस्ते सुभाषगिरी महाराज (धार्मिक परंपरा), माधव बर्वे (कृषी, कोठुरे), सचिन जोशी (शिक्षण), अपूर्वा जाखडी (अंतराळ), विनायक जाधव महाराज (सामाजिक), जयंत नातू (विशेष सन्मान) यांना मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकsocial workerसमाजसेवक