शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

वर्गमित्र असलेल्या निवृत्त जवानाला मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 16:49 IST

माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम : मेशीत काढली मिरवणूक

ठळक मुद्देशिरसाठ हे मेशी या मुळ गावी परतल्यावर त्यांची गावातून पारंपारिक पद्धतीने लेझिम पथकाच्या संचलनात मेशी माध्यमिक विद्यालयात मानवंदना देण्यात आली.

देवळा : एखाद्या हॉटेलात जमायचे आणि मौजमजा करायची, असले फॅड आता माजी विद्यार्थ्यांमध्ये बघायला मिळते. परंतु, मेशी येथील विद्यालयातील दहावीच्या १९९३ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपलाच वर्गमित्र असलेल्या आणि भारतीय सैन्य दलात नायक पदावरून निवृत्त झालेल्या जवानाची मिरवणूक काढून त्याला अनोखी मानवंदना दिली.देवळा तालुक्यातील मेशी येथील १९९३ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी देविदास बळीराम शिरसाठ हे १९९७ साली सैन्य दलातील इलेक्ट्रिक मशीन इंजिनियर कोअर मध्ये भरती झाले. सेवा कालावधीत ते कारगिल, जम्मू काश्मीर, नागालँड, नवी दिल्ली, नाशिक, हिस्सार आदी ठिकाणी कर्तव्यावर होते. कारगिल युद्धात त्यांनी सहभाग घेतला होता. बावीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आपला वर्गमित्र निवृत्त होत असल्याचे त्यांच्या वर्गमित्रांना कळल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी भारत मातेच्या सुपुत्राने केलेल्या देशसेवेबद्दल मानवंदना देण्यासाठी एकत्र येण्याचे ठरवले, त्यानुसार शिरसाठ हे मेशी या मुळ गावी परतल्यावर त्यांची गावातून पारंपारिक पद्धतीने लेझिम पथकाच्या संचलनात मेशी माध्यमिक विद्यालयात मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शाळा ते जगदंबा माता मंदिरा पर्यंत मिरवणूक काढून मंदिर सभागृहात सर्व वर्गमित्रांच्यावतीने त्यांचा सपत्नीक सन्मान चिन्ह व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. अतिशय स्तुत्य व अभिनव पद्धतीने साजरा केलेल्या या गेट-टुगेदरचे गावकऱ्यांनाही कौतुक वाटले. यावेळी विलास कुमावत, वसंत शिरसाठ, राजू शिरसाठ, मनोहर पगार, प्रमोद आहेर, विष्णू जाधव, दिनकर कुमावत, मधुकर शिरसाठ, विनय बागुल, दयाराम सावंत, चिंतामण सोनवणे, रघु पगारे, मनीष जाधव, रवींद्र आहेर, रेखा कुवर, दिनेश खैरणार, विलास पवार, सुजाता आहिरे आदीसह अनेक वर्गमित्र उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक