शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

साल्हेर घाट रस्ता बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 16:56 IST

सटाणा : बागलाण तालुक्यातील नुकत्याच झालेल्या घाट किटंगच्या सदोष कामामुळे वारंवार दरड कोसळून पश्चिम भागाच्या आदिवासी गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत होत आहे. लाखो रु पये खर्चून केलेला हा घाट रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला असून सदर रस्त्याच्या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.

बागलाण तालुक्यातील पश्चिम भागाच्या आदिवासींचा विकास व्हावा म्हणून शासनाने रस्त्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गेल्या वर्षी वाघंबा साल्हेर दरम्यानच्या साल्हेर घाट रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले होते.या कामासाठी दोन कोटीहून अधिक निधी मंजूर होऊन गेल्या वर्षी कामाला सुरु वात करण्यात आली. या कामामुळे तब्बल चार ते पाच महिने हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. या कामामुळे आदिवासींना अक्षरश: पाच पाच किलोमीटर पायपीट करावी लागत होती. दरम्यान, काम पूर्ण झाले म्हणून या रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र घाट रस्त्याच्या सदोष कामामुळे पावसाळा सुरु झाल्यापासून वारंवार दरड कोसळून वाहतुकीला अडथळा होत आहे. या घाट रस्त्यामुळे गुजरात व कळवण तालुक्याला जोडणारा जवळचा मार्ग ठरणार आहे. या घाट रस्त्याच्या कामासाठी आतापर्यंत शासनाने दहा कोटीहून अधिक निधी खर्च केला आहे. दरवर्षी एकाच कामाच्या दोन दोन वेळा निविदा देखील काढल्या जातात किरकोळ नावात बदल करून निधी लाटला जात असल्याचे दस्तुरखुद्द ठेकेदार वर्तुळातच उघडपणे चर्चा केली जात आहे. या चर्चेमुळे पुन्हा एकदा अधिकारी , पुढारी आणि ठेकेदार यांची अभद्र युती चव्हाट्यावर आली आहे.इन्फोसाल्हेर किल्ला सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. किल्ला व परिसर पाहण्यासाठी कोल्हापूर ,पुणे ,सातारा ,मुंबई ,ठाणे , औरंगाबाद, नगर, सोलापूर, जळगाव, धुळे या जिल्ह्यासह गुजरात, मध्यप्रदेशमधील पर्यटक मोठ्या संख्यने साल्हेर येथे हजेरी लावतात.साल्हेर येथे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असून वारंवार या घाट रस्त्यात दरड कोसळत असल्यामुळे सदर रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावर वाहून आलेली माती, त्यात अचानक कोसळलेल्या दगड-गोट्यांमुळे छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे.संबधित विभागाने कामाची चौकशी करावी अशी मागणी आदिवासी भागातील नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक