शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

सफेद कांदा उत्पादकांपुढे विक्रीचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:45 IST

कवडदरा : दरवर्षी उन्हाळ्यात इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील पिंपळगाव डुकरा, साकूर, शेणीत, भरवीर, घोटी खुर्द परिसरातील पांढरा कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल होत असतो. परंतु मागील काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढू लागल्याने कांदा विक्रीसाठी उपलब्ध असणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. कांदा तयार होऊनही विक्रीसाठी बाजारात पोहोचू शकत नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

ठळक मुद्देकोरोनाचा कहर : आठवडे बाजार बंद, शेतकरी अडचणीत

कवडदरा : दरवर्षी उन्हाळ्यात इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील पिंपळगाव डुकरा, साकूर, शेणीत, भरवीर, घोटी खुर्द परिसरातील पांढरा कांदाबाजारात विक्रीसाठी दाखल होत असतो. परंतु मागील काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढू लागल्याने कांदा विक्रीसाठी उपलब्ध असणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. कांदा तयार होऊनही विक्रीसाठी बाजारात पोहोचू शकत नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.इगतपुरी तालुक्यात विविध पिकांबरोबरच पांढऱ्या कांद्याचेही पीक घेतले जाते. तालुक्यातील अनेक ठिकाणी विविध पिकांची लागवड करण्यात येत असते. विविध प्रकारच्या फळभाज्यांची, त्यामध्ये पांढऱ्या कांद्याच्या पिकांचीही लागवड केली जाते. हा पांढरा कांदा आरोग्यासाठी व शरीराची दाहकता कमी करण्यासाठी गुणकारी असल्याने या कांद्याला बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे रब्बीच्या हंगामात कांद्याचे उत्पादन तयार करून अनेक शेतकरी हा कांदा बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात. विशेषत: गावोगावी भरणारे आठवडी बाजार हे या कांदा विक्रीसाठीची महत्त्वाची बाजारपेठ आहे. त्या ठिकाणीच या शेतकऱ्यांच्या कांद्यांची विक्री होत असते. साधारणपणे १०० ते १५० रुपयांना एक माळ विकली जाते. यातूनच त्यांना चांगले उत्पन्न मिळते; परंतु मागील काही दिवसांपासून या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढू लागला आहे. नागरिकांची होणारी गर्दी, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भरणाऱ्या बाजारावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता हा सफेद कांदा विकायचा कसा, असा पेच या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्यांदा अशा विक्रीसाठी अडचणी निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.शेतकऱ्यांची विक्रीसाठी धडपडविक्रीसाठी आठवडी बाजार खुले नसल्याने कांद्याच्या तयार केलेल्या माळा विकण्यासाठी आता हे शेतकरी कांदा वाहनात भरून एखाद्या गावाच्या ठिकाणी, नातेवाईक, आदी ठिकाणी जाऊन विक्रीचा प्रयत्न करीत आहेत. त्यासोबतच काही शेतकऱ्यांकडून समाजमाध्यमांवरून कांदा उपलब्ध असल्याची जाहिरात करून विक्री केली जाऊ लागली आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना, परंतु केलेला खर्च निघून दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.दरवर्षी आम्ही पांढऱ्या कांद्याची लागवड करतो. तयार झालेला कांदा विविध ठिकाणी भरणाऱ्या आठवडी बाजारांत विकतो. या कांद्याला चांगली मागणी असल्याने कांदा शेवटपर्यंत मागणीतच राहतो. मात्र आता आठवडी बाजारही बंद आहेत. ज्यांना माहीत आहे, ते शेतावर येऊन घेऊन जातात. तरीही झालेले कांद्याचे उत्पादन व होणारी विक्री यांमध्ये मोठी तफावत असून कांदा वेळेवर विकला गेला नाही तर त्याची नासाडी होण्याची शक्यता आहे.- शरद वाकचौरे, शेतकरीफोटो- ०८ व्हाईट ओनियन

टॅग्स :onionकांदाMarketबाजार