शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

संरक्षित प्राण्यांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या मांडूळसह घारीची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:47 IST

संरक्षित प्राण्यांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या दुर्मीळ सर्पाच्या प्रजातीपैकी एक मांडूळ जातीच्या सर्पासह घारीची तीस लाखांत रुपयांमध्ये विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताच्या वनविभाग व पोलिसांनी मुसक्या आवळल्या. नाशिकरोड परिसरातील मोरे मळ्यात गुन्हे शाखेच्या युनिट-२च्या पथकाने वनविभागाच्या कर्मचाºयांसह छापा मारला.

नाशिक : संरक्षित प्राण्यांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या दुर्मीळ सर्पाच्या प्रजातीपैकी एक मांडूळ जातीच्या सर्पासह घारीची तीस लाखांत रुपयांमध्ये विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताच्या वनविभागपोलिसांनी मुसक्या आवळल्या. नाशिकरोड परिसरातील मोरे मळ्यात गुन्हे शाखेच्या युनिट-२च्या पथकाने वनविभागाच्या कर्मचाºयांसह छापा मारला.  याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, संरक्षित प्राण्यांची होणारी तस्करी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली मोरे मळ्यात संशयित ज्ञानेश्वर ऊर्फ दिनेश सोनाजी चव्हाण (३६, रा. गुंबाडे चाळ, खोली क्र. १) याच्या घरी छापा टाकला. यावेळी वनपरिमंडळ अधिकारी (पश्चिम) रवींद्र सोनार, वनरक्षक विजयसिंग पाटील, उत्तम पाटील हेदेखील कारवाईत सहभागी होते. पोलिसांनी चव्हाण यास ताब्यात घेतल्यानंतर राहत्या घरात एका मातीच्या मडक्यात मांडूळ दडवून ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मडके तपासले असता त्यामध्ये सुमारे ११५ सें.मी लांबीचा तपकिरी रंगाचा मांडूळ जातीचा सर्प व घार आढळून आली.सर्प व घारीला वनविभागाच्या अधिकाºयांना सोपविण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी चव्हाण यास अटक केली असून, त्याच्यावर वन्यप्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चव्हाण यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.न्यायालयाच्या आदेशानंतर मुक्ततानाशिकरोड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी वनविभागाला पुणे येथील झुलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाकडून वन्यप्राणी मांडूळ व घारीची ओळख पटविण्याचे आदेश दिले आहे. यानुसार या संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्यानंतर न्यायालयीन आदेशाने मांडूळ व घारीला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार असल्याचे वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार यांनी सांगितले.सातशे ग्रॅम वजनमांडूळ जातीच्या सर्पाविषयी समाजात अंधश्रद्धा आहे. तसेच निसर्गातील विविध पक्ष्यांच्या बाबतीमध्येही अशाच अंधश्रद्धेपोटी विविध समज-गैरसमज पसरलेले आहेत. त्यामुळे मांडूळसारख्या सर्पाला मोठी किंमत बाजारात मिळते. मांडुळाची लांबी, वजनावरून त्याची किंमत ठरविली जाते. हजारो ते लाखोंच्या घरामध्ये किंमत मिळत असल्याने मांडूळची तस्करी केली जाते. छापा टाकून जप्त करण्यात आलेल्या मांडूळचे वजन अंदाजे सातशे ग्रॅम इतके होते.

टॅग्स :forest departmentवनविभागPoliceपोलिस