शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
5
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
6
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
7
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींचा इच्छापूर्ती काळ, अनपेक्षित लाभ; नफा-फायदा, दसरा भरभराट करेल!
9
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
10
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
11
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
12
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
13
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
14
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
15
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
16
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
17
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
18
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
20
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार

पाण्याअभावी कांदापात काढली विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 18:17 IST

देशमाने परिसर : भाव घसरल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका

ठळक मुद्देकांद्याने शेतक-यांचे सर्व अंदाज फोल ठरवत डोळ्यात पाणी आणले आहे.

देशमाने : येवला तालुक्यात झालेला अत्यल्प पावसाने विहिरींनीही तळ गाठला कांद्याची उभी पिके कांदापात म्हणून विकण्याची वेळ शेतक-यांवर येऊन ठेपली आहे. नगदी पीक म्हणून परिसरात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र कांद्याने शेतक-यांचे सर्व अंदाज फोल ठरवत डोळ्यात पाणी आणले आहे.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा कांद्याला चांगला भाव मिळेल, असा अंदाज शेतक-यांचा होता. परिणामी रब्बी हंगामातील गहू, हरबरा आदी पिके न घेता कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. कांदा लागवडीवर अन्य पिकांच्या तुलनेत उत्पादन खर्च देखील वाढला. मात्र सगळे चित्र उलटे झाले. गत वर्षाचा उन्हाळ कांदा घसरलेल्या बाजारभावामुळे तब्बल ८ ते ९ महिने चाळीत पडून राहिला. जास्त कालावधीमध्ये सदर कांदा चाळीतच सडला तर अनेक शेतक-यांनी तो मातीमोल भावात विकला. पाठोपाठ लाल कांद्याचीही तीच गत झाली. आता तर काढणीस आलेल्या कांद्यास मजूर मिळणे देखील कठीण झाल्याने शेतकºयांवर उभ्या पिकांत जनावरे सोडून देण्याची वेळ आली आहे. कांदा पिकामुळे परिसरात गव्हाचे क्षेत्र निम्म्याहून अधिक घटले. एकीकडे गव्हाचे बाजारभाव वाढत आहेत तर कांदा पिकाचा उत्पादन खर्चही निघत नाही. दुसरीकडे झालेला खर्चही निघेना व कांदा पिकामुळे फायदेशीर ठरणारे गव्हाचे पीकही बुडाल्याने शेतकºयांचे दुहेरी नुकसान होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा