शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चढ्या दराने कांदा बियाणांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:38 IST

सायगाव : गत वर्षीच्या रोगट हवामानामुळे लाल व उन्हाळ कांदयाचे बियाणे शेतकऱ्यांना साधले नाही. परिणामी या हंगामात शेतकºयांनी कांदा ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांची लूट : यंदा उन्हाळ कांद्याचे क्षेत्र घटणार

सायगाव : गत वर्षीच्या रोगट हवामानामुळे लाल व उन्हाळ कांदयाचे बियाणे शेतकऱ्यांना साधले नाही. परिणामी या हंगामात शेतकºयांनी कांदा बियाणे निर्मिती करणाºया विविध कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्यावर भर दिला आहे. शेतकºयांजवळ स्वत:चे बियाणे उपलब्ध नसल्याने बियाण्यांची वाढती मागणी लक्षात घेत कंपन्यांकडून तीन पट दराने बियाण्यांची विक्र ी केल्या जात असल्याने शेतकºयांची लूट सुरू आहे. विशेष म्हणजे कांदा बियाणांबाबत कंपन्या कोणतीच गॅरंटी देत नसल्याने स्थानिक विक्र ेतेही हात वर करत आहे. केवळ नशिबावर हवाला ठेवून शेतकरी कांद्याचा हंगाम फुलवण्याचे स्वप्न बघत आहे.येवला तालुक्यात तीन हंगामात घेतला जाणाºया पोळ, रांगडा, उन्हाळ कांदयाची लागवड सुमारे ३३ हजार हेक्टर क्षेत्रात केली जाते. त्यात पोळ व रांगडा (लाल कांदा) हे १४ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असते. तर १५ ते १८ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळ कांद्याची लागवड दरवर्षी केली जाते. बियाण्यांची टंचाई व वाढते भाव यामुळे यावर्षी उन्हाळ कांद्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात सततच्या पावसाने लाल कांदयाची रोपे सडली. विविध कंपन्यांची बियाणे विकत आणुन पुन्हा रोपे टाकली. या बियाण्यांची उगवण क्षमता केवळ ४० ते ५० टक्के इतकीच राहिली. त्यामुळे लाल कांद्याचे लागवड क्षेत्र निम्याने कमी झाले. त्यात पुन्हा पावसाने कांदा पिक खराब झाले. बियाणे टंचाईच्या पाश्वभूमिवर बाजारात बोगस बियाणे विक्र ेत्यांचा सुळसुळाट आहे. केवळ रोप उतरून उपयोग नाही तर कांदा पिकाला दर्जा व उत्पादन मिळणे ही महत्वाचे आहे. शेतकºयांची ही लूट थांबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.कंपन्यांकडून हमी नाहीरब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याचा हंगाम तरी वाया जावू नये, या आशेपोटी शेतकरी चढया दराने का होईना पण बियाणे खरेदी करतांना दिसत आहे. बाजारात विविध कंपन्यांकडून कांद्याचे बियाणे विकले जात आहे. दीड महिन्यांपूर्वी काही कंपन्यांनी १ हजार ८०० रु पये प्रति किलो दराने कांदा बियाणे विकले. वाढती मागणी लक्षात घेता आज त्याच बियाण्यांची किंमत ४ हजार ५०० रूपये प्रति किलो दराने केली जात आहे. आधी तुम्ही चार दाणे टाकुन पहा, उतरले नाही तर बियाणे परत करा. अशी हमी एक दोन कंपन्या देत आहेत, मात्र इतर कंपन्या, विक्र ेते कोणतीच हमी न घेता सर्रास बियाण्याची विक्र ी करत आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा