शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भाईगिरीसाठी केला गोळीबाराचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:53 IST

एकलहरे येथे दोन दिवसांपूर्वी रात्री युवकावर झालेल्या गोळीबार प्रकरणी त्या जखमी युवकाने दोघा मित्रांच्या मदतीने भाईगिरी करून प्रसिद्धी मिळविण्यासाठी गोळीबाराचा बनाव घडवून आणल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे.

नाशिकरोड : एकलहरे येथे दोन दिवसांपूर्वी रात्री युवकावर झालेल्या गोळीबार प्रकरणी त्या जखमी युवकाने दोघा मित्रांच्या मदतीने भाईगिरी करून प्रसिद्धी मिळविण्यासाठी गोळीबाराचा बनाव घडवून आणल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. या प्रकरणी जखमी युवकांसह त्याचा एक मित्र व अल्पवयीन मुलगा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून गावठी कट्टा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  एकलहरे चेमरी नंबर १ ऐश्वर्या रो-हाउस येथे राहणारा मुकेश रावसाहेब सपकाळ (२२) मूळ रा. कोपरगाव हा मनपा नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या कार्यालयात कामाला आहे. मुकेश बुधवारी (२५ जुलै) रात्री ११ वाजता एकलहरे कॉलनीत वाघमारे यांच्याकडे मोबाइल रिचार्ज करण्यासाठी गेला होता. मोटारसायकल लावत असताना अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात मुकेश याच्या कमरेजवळ गोळी लागल्याने तो जखमी झाला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर दोघे युवक अंधारातून मोटारसायकलवर पळून गेले अशी फिर्याद देण्यात आल्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.  सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर व नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक जयदीप गोसावी, हवालदार विलास उजागरे, संतोष घुगे, भालेराव, नीलेश विखे, विशाल कुंवर, अविनाश जुंद्रे या गोळीबार घटनेचा तपास करत असताना जखमी मुकेश सपकाळ याची चौकशी केली असता कोपरगाव येथील एका खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांना पोलिसांना आपली नावे मुकेश याने सांगितल्याचा संशय आहे. त्यामुळे खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांनी गोळीबार केल्याचा संशय जखमी मुकेश याने व्यक्त केला.  गुरुवारी पोलीस पथकाने कोपरगाव येथे जाऊन संशयितांची माहिती घेऊन कसून चौकशी केली. तर त्यातील एक संशयित मोका कायद्यान्वये कारागृहात असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलिसांचा जखमी मुकेशवरच संशय बळावला.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे व सहकाऱ्यांनी जखमी मुकेश यांचा मोबाइल व सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज तपासून जखमी मुकेश याचीच कसून चौकशी केली असता भाईगिरी करण्यासाठी प्रसिद्धी मिळविण्यासाठी व कोपरगाव खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीपासून बचाव करण्यासाठी एकलहरे येथील अल्पवयीन मित्र व संशयित संदेश ऊर्फ सॅन्डी आनंदा भालेराव (वय २०), रा. पहाडीबाबा झोपडपट्टी, सिद्धार्थनगर, एकलहरा यांच्या मदतीने गोळीबाराचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. यामध्ये संशयित अल्पवयीन मुलाने गावठी कट्ट्यातून गोळीबार करून संदेश भालेराव यांच्या गाडीवरून पळून गेले.पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलाच्या घरून गावठी कट्टा जप्त केल्याची माहिती उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा