शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक एकतेसाठी संतांचे योगदान : टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 00:51 IST

महाराष्ट्रात वारकरी, नाथ, महानुभाव, श्री दत्त, गणेश, देवी असे वेगवेगळे संप्रदाय असून त्यातील संतांची थोर परंपरा आहे़ महाराष्ट्राच्या जडण-घडणीत संतांचे योगदान मोठे असून, समाजाच्या हितासाठी प्रसंगी त्यांनी बंडखोरीही केली़

नाशिक : महाराष्ट्रात वारकरी, नाथ, महानुभाव, श्री दत्त, गणेश, देवी असे वेगवेगळे संप्रदाय असून त्यातील संतांची थोर परंपरा आहे़ महाराष्ट्राच्या जडण-घडणीत संतांचे योगदान मोठे असून, समाजाच्या हितासाठी प्रसंगी त्यांनी बंडखोरीही केली़ संतांचे विचार व आचार यामुळेच सामाजिक एकता टिकून राहिल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ तथा संत साहित्याचे अभ्यासक अभय टिळक यांनी व्यक्त केले. गंगापूर रोडवरील शंकराचार्य सभागृहात प्रमिला मिरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित २४व्या मिरजकर स्मृती सोहळ्यात ‘संतांची बंडखोरी’ या विषयावर ते बोलत होते़टिळक पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील संतांनी कधीही मी असा भाव न धरल्याने ते मोठे कार्य करू शकले़ समाजातील अनेक क्षेत्रांमधील आजही संतांसारखी ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असल्याने या क्षेत्राचा व संस्थांचा विकास होतो आहे़ समाजाचे संस्थांकरण हे महत्त्वाचे कार्य प्रारंभी संतांनीच केले़ धर्म, वंश जात यामध्ये भेदभाव केला जाऊ नये यासाठी संत आणि संस्था यांचे कार्य मोलाचे होते़ राज्यातील अनेक चळवळी या संतांशी निगडित असून समतेची चळवळ ही महात्मा फुले यांच्याशी तर प्रार्थना समाज ही न्या. रानडे यांची चळवळ भागवत परंपरेशी तर शाहू महाराजांच्या चळवळीचा प्रवास पुन्हा समतेकडे जातो़  महाराष्ट्राच्या विकासासाठी आजही या चळवळींचे कार्य आवश्यक असल्याचे टिळक यांनी सांगितले. यावेळी अभय टिळक व मान्यवरांच्या हस्ते कॉलेजरोडवर गत ३०-३५ वर्षांपासून वैद्यकीय सेवा देणारे फॅमिली डॉक्टर डॉ. मोहन टेंबे, त्र्यंबकेश्वर येथील वेदशास्त्रसंपन्न त्र्यंबक (बाळासाहेब) भास्कर दीक्षित शास्त्री व ज्येष्ठ विधीज्ज्ञ सुहास मिसर यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.रुग्णाचे शरीर व मनाचे फॅमिली डॉक्टरला ज्ञानरुग्णाचे केवळ शरीरच नव्हे तर मनाचाही ठाव ज्या डॉक्टरांना कळतो तेच खरे फॅमिली डॉक्टर होय अशी व्याख्या टिळक यांनी सांगितली़ अद्ययावत तंत्रज्ञानाच्या या युगात प्रामाणिक, निष्ठावान डॉक्टर आहेत़ मात्र, रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संवाद हरवत चालला असून हा संवाद वाढविण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे टिळक म्हणाले़

टॅग्स :Nashikनाशिक