शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

एरंडगाव येथे ‘सही पोषण -देश रोशन’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:09 IST

एरंडगाव : पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना व ग्रामपंचायत एरंडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सही पोषण -देश रोशन अभियान कार्यक्रम संपन्न झाला.

ठळक मुद्दे पोषण आहारासाठी घरगुती उपलब्ध साहित्य व वस्तू पासून तयार सकस आहाराची प्रात्यक्षिक मांडणी

एरंडगाव : पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना व ग्रामपंचायत एरंडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सही पोषण -देश रोशन अभियान कार्यक्रम संपन्न झाला.अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्या कमलताई आहेर, पंचायत समिती सदस्या कविताताई आठशेरे, अनिताताई काळे, सरपंच मंदाकिनी पडोळ, कृऊबा संचालक नवनाथ काळे, विस्तार अधिकारी अनिल जºहाड आदी उपस्थित होते महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे, कॅल्शीयमचे प्रमाण कमी असल्याचे वेगवेगळ्या पाहणीतून पुढे आले आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्याव. शुध्द व सकस आहार घ्यावा. कुटुंबा बरोबर स्वत:ची ही काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रतीपादन सभापती गायकवाड यांनी यावेळी बोलतांना केले. कार्यक्रमात कुपोषित बालक व गरोदर माता यांच्या पोषण आहार बाबत विविध पद्धतीने मांडणी करून माहिती देण्यात आली. तत्पूर्वी उपस्थित सर्व अंगणवाडी कार्यकर्ती यांनी गावातून घोषणा देत जनजागृतीपर फेरी काढली होती. सही पोषण -देश रोशन अभियानात कुपोषण निर्मूलन, स्री भ्रूण हत्या याबाबत जयश्री खकाळे व रुपाली उंडे यांची जनजागृतीपर भाषणे झाली. यावेळी पोषण आहारासाठी घरगुती उपलब्ध साहित्य व वस्तू पासून तयार सकस आहाराची प्रात्यक्षिक मांडणी करण्यात आली होती. तर रांगोळी द्वारे ही सुंदर रेखाटन करून याबाबत जागृती करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते बेबी किटचे वाटप करण्यात आले. पदोन्नतीने अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून निवड झालेल्या अलका ठाकरे व शेळके यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमास कचरू उराडे, भास्कर पडोळ, अण्णासाहेब जोंधळे, प्रशांत पाटील, दिलीप मोरे, सोमनाथ भालनुर, अशोक उराडे, योगेश उराडे, भिमाजी मोरे, ज्ञानेश्वर खकाले, बबन घोरपडे, चंद्रभान मोरे, पिंटू मोरे, कोंडिराम मोरे, तुळशीराम मढवई, कविता पडोळ, रुक्सार पटेल, सुवर्णा चव्हाण, सुनीता खापरे, छाया गोसावी, पयर्वेक्षिका अहिरराव, भालेराव, शिंपी उपस्थित होते.प्रास्ताविक पयर्वेक्षिका अहिरराव यांनी केले. सूत्रसंचालन ग्रामसेवक देवचंद शिंदे यांनी केले.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदGovernmentसरकार