जळगाव नेऊर : न्यू इंग्लिश स्कूल भारम विद्यालयाचे उपशिक्षक साहेबराव आनंदराव धांडे हे ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनिमित्त विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक एस. पी. अनर्थे यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच बाळासाहेब थोरात, उपसरपंच नानाभाऊ अहेर आदि उपस्थित होते. यावेळी नगरसूल शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखांतील कर्मचारी तसेच भारम विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)
साहेबराव धांडे सेवानिवृत्त
By admin | Updated: May 13, 2014 00:42 IST