शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या बंडाच्या पवित्र्याने युतीत असहकार्याची ठिणगी

By श्याम बागुल | Updated: October 15, 2019 20:15 IST

युतीच्या जागावाटपात नाशिक शहरातील तिन्ही जागा भाजपला सोडण्यात आल्याने स्थानिक शिवसेनेत तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. त्यातल्या त्यात नाशिक पश्चिम मतदारसंघ तरी जागावाटपात सुटावा, अशी मागणी शिवसेनेने पक्ष नेत्यांकडे केली. परंतु भाजपने जागा सोडण्यास नकार दिल्याने सेनेत असंतोष खदखदत होता

ठळक मुद्देशेवटच्या टप्प्यात मोठा धक्का : भाजपच्या जागा अडचणीत निफाड, नांदगाव, इगतपुरी या तीन ठिकाणी सेनेच्या उमेदवारांसमोर भाजपने उमेदवार उभे केले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : भाजपने घुसखोरी केल्याचा आरोप करून नाशिक शहराच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी पदांचे राजीनामे देऊन सेना बंडखोर उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे भाजप-शिवसेना युतीवर दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागले आहेत. सेनेच्या सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघातच थांबून प्रचार करण्याचे जाहीर करून शहरातील नाशिक मध्य व पूर्व मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनाही वा-यावर सोडले आहे.

युतीच्या जागावाटपात नाशिक शहरातील तिन्ही जागा भाजपला सोडण्यात आल्याने स्थानिक शिवसेनेत तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. त्यातल्या त्यात नाशिक पश्चिम मतदारसंघ तरी जागावाटपात सुटावा, अशी मागणी शिवसेनेने पक्ष नेत्यांकडे केली. परंतु भाजपने जागा सोडण्यास नकार दिल्याने सेनेत असंतोष खदखदत होता व त्यातूनच सेनेने पश्चिम मतदारसंघात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी केली. सेनेच्या या बंडखोरीविरुद्ध भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांनी स्वपक्षाच्या नेत्यांकडे तक्रार करतानाच सेनेच्याही नेत्यांच्या कानी हा प्रकार घातला. परिणामी सेनेने आणखी चिडून पश्चिम मतदारसंघात प्रचाराला वेग दिल्यामुळे पक्षाकडून कारवाई होण्याच्या शक्यतेने मंगळवारी नाशिक शहर शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी आपल्या पदांचे राजीनामे पक्षाकडे सुपूर्द करून शहरातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक पश्चिम मतदारसंघात प्रचार करतील, असे जाहीर केले. शिवसेनेच्या या पवित्र्यामुळे पश्चिम मतदारसंघात भाजप उमेदवार सीमा हिरे यांची डोकेदुखी आणखी वाढली, त्याचबरोबर नाशिक मध्य व नाशिक पूर्वमधील भाजपच्या उमेदवारांना आता शिवसेनेचे सहकार्य मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप व सेनेने निवडणुकीत युती केली असून, ज्या मतदारसंघात भाजप उमेदवार असेल तेथे सेनेचे कार्यकर्ते भाजपचा प्रचार करतील, तर शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार भाजपचे कार्यकर्ते करतील, असे ठरलेले असून, त्यात दोन्ही पक्षांनी एकमेकांना गृहीत धरले आहे. मात्र नाशिक शहरात सेनेने घेतलेल्या भूमिकेचा जिल्ह्यात युतीच्या अन्य उमेदवारांवर परिणाम होणार असून, जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात यापूर्वीच सेनेच्या उमेदवारांविरुद्ध भाजपच्या उमेदवारांनी बंडखोरी केल्यामुळे युतीत धुसफूस सुरू असताना आता थेट सेनेने बंडाचा पवित्रा घेतल्याने त्यात ठिणगी पडली आहे.जिल्ह्यातील पंधरा जागांपैकी सेना नऊ व भाजपा सहा जागांवर लढत असून, त्यातील निफाड, नांदगाव, इगतपुरी या तीन ठिकाणी सेनेच्या उमेदवारांसमोर भाजपने उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे तेथील वचपा काढण्यासाठी आता सेनेने भाजपचे उमेदवार उभे असलेल्या ठिकाणी सहकार्य न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे युतीच्या बेबनावाचा फायदा विरोधी पक्षांना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक