------
रेनकोट, छत्री दुकानांमध्ये गर्दी
नाशिक : सततच्या पावसाने शहरातील छत्री विक्रेते तसेच रेनकोटच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागल्याचे चित्र आहे. पाऊस संततधार पडत असल्याने त्याला टाळता येणे शक्य होत नसल्याने नागरिकांनी रेनकोट खरेदी करण्याला पसंती दिली आहे.
----
सायकलिंग ट्रॅक खुला करावा
नाशिक : शहरातील गोल्फ क्लब आणि जिल्हा रुग्णालयादरम्यानचा सायकलिंग ट्रॅक खुला करण्याची मागणी नाशिकच्या सायकलप्रेमींकडून मनपा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. सायकलिंग हा सर्वोत्तम व्यायाम असून, सध्याच्या काळात सायकलिंगला प्रोत्साहन द्यावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
----
ॲम्ब्युलन्सच्या संख्येत घट
नाशिक : महानगरातील कोरोना रुग्णसंख्या घटली असल्याने शहरातून सातत्याने आवाज करीत फिरणाऱ्या ॲम्ब्युलन्सच्या प्रमाणातही बरीच घट आली आहे. अन्यथा, दिवसभरात कोणत्याही वेळी रस्त्यावर बाहेर पडल्यास दोन-तीन ॲम्ब्युलन्स आवाज करीत पुढे जात होत्या.
-----
विजेचा लपंडाव सुरूच
नाशिक : सर्वत्र पडलेल्या पावसादरम्यान शहरातील शरणपूररोड, कॉलेजरोड, शिंगाडा तलाव, जुने नाशिक भागात विजेचा लपंडाव सुरूच होता. जुलै महिना अर्धा उलटून गेल्यानंतरही थोड्याशा पावसाने वीज गायब होत असल्याबाबत नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात आला.