नाशिक : रायन इंटरनॅशनल टागोरनगर शाळेचा इ. १० वी चा निकाल शंभर टक्के लागला असून या परिक्षेत प्रथम क्रमांक आर्यन पंकज स्वाने (९६.८३), द्वितीय क्रमांक अभिज्ञान चक्रवर्ती (९५.३०) व भूषण गायकवाड (९४.६०) तर तृतीय क्रमांक यश भामरे (९३.३०) याने मिळविला. रायन शाळेची आय.सी.एस.ई मंडळाची पाचवी बॅच असून १०० टक्के निकालाची परंपरा शाळेने राखली. या परिक्षेसाठी एकूण ७७ विद्यार्थी बसलेले होते. त्यात मेरीटमध्ये १३ विद्यार्थी, विशेषश्रेणीत २३ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ३६ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत ५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन डॉ. ऑगस्टिन पिंटो, संचालक ग्रेस पिंटो यांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)
रायन इंटरनॅशनलचा निकाल १०० टक्के
By admin | Updated: May 31, 2014 00:23 IST