शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

ग्रामीण डाकसेवकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:27 IST

ग्रामीण डाकसेवकांना टपाल खात्यात समाविष्ट करून सातवा आयोग लागू करावा या प्रलंबित प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी ग्रामीण डाकसेवकांनी टपाल खात्याच्या प्रशासनाविरोधात एल्गार पुकारत बेमुदत संप पुकारला आहे. मंगळवारी (दि.२२) ग्रामीण डाकसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

नाशिक : ग्रामीण डाकसेवकांना टपाल खात्यात समाविष्ट करून सातवा आयोग लागू करावा या प्रलंबित प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी ग्रामीण डाकसेवकांनी टपाल खात्याच्या प्रशासनाविरोधात एल्गार पुकारत बेमुदत संप पुकारला आहे. मंगळवारी (दि.२२) ग्रामीण डाकसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. टपाल खात्याचा मुख्य कणा मानला जाणारा ग्रामीण डाकसेवक हा घटक आजही उपेक्षित असून, न्यायहक्कांसाठी संघर्ष करीत आहे. टपाल वाटपापासून ते लिपिकापर्यंत आणि सर्वच सरकारी योजनांचा प्रचार-प्रसार व अंमलबजावणीपर्यंत विविध कामे गावपातळीवर आदिवासी दुर्गम भागात विविध अडचणींना तोंड देत करणाºया ग्रामीण डाकसेवकांकडे टपाल खात्याने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. यामुळे ग्रामीण डाकसेवकांच्या आॅल इंडिया पोस्टल जीडीएस एम्प्लॉइज युनियन या संघटनेने देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामध्ये नाशिक विभागाच्या सुमारे तीनशे कर्मचाºयांनी सहभाग घेतला आहे.  दरम्यान, मंगळवारी जीपीओ रस्त्यावरील मुख्य डाकघर कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने ग्रामीण डाकसेवक सहभागी झाले होते. ‘अनुकंपा तत्त्वामार्फत सर्वांना सेवेत घ्या’, ‘नियमित कर्मचाºयांप्रमाणे सुविधा द्या, भेदभाव बंद करा’, ‘डाकसेवकांची पिळवणूक थांबवा’, ‘सातवा वेतन आयोग लागू करा’, ‘रिक्त जागा त्वरित भरा’ आदी मागण्यांचे फलक मार्चेकरांनी झळकविले. तसेच हमारी युनियन, हमारी ताकद...जीडीएस युनियन जिंदाबाद... जीडीएस एकता जिंदाबादच्या घोषणा देत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष राजाराम जाधव, सचिव सुनील यांनी केले. बी.डी. भालेकर मैदान, शालिमार, सीबीएसमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी सहभागी मोर्चे कºयांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी जाधव, जगताप यांच्यासह प्रकाश पाटील, नंदू निकम, संजय उगले, गोपिनाथ शिरसाठ, जयश्री मुरकुटे, सायली वाणी, सविता कदम आदि उपस्थित होते.मुख्य टपाल कार्यालयापुढे निदर्शने करताना ग्रामीण डाकसेवक कर्मचारी.