शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मांजरीमागे धावताना बिबट्याही विहिरीत, शिकाऱ्याच्याच पाठीवर तिने काढली रात्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 08:25 IST

वनविभागाच्या बचाव पथकाने वाचविले दोघांचेही जीव

शैलेश कर्पे/नितीन शिंदे  सिन्नर/ठाणगाव (जि. नाशिक) : मांजराच्या पाठीमागे लागलेला बिबट्या मांजरापाठोपाठ विहिरीत कोसळला. सावज असलेली मांजर आणि शिकारी असलेला बिबट्या रात्रभर विहिरीतील पाण्यात पोहून थकले. विहिरीत असलेल्या लोखंडी अँगलवर पोहून थकलेला बिबट्या विसावला आणि त्याच्या पाठकुळी मांजर बसली. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्या आणि मांजर या दोघांचे जीव वाचविल्याची घटना सिन्नर तालुक्यातील टेंभूरवाडी (आशापूर) येथे घडली. 

सिन्नर तालुक्यातील टेंभूरवाडी (आशापूर) येथे विहिरीच्या पाण्यात पडलेल्या बिबट्याने लोखंडी  अँगलचा आधार घेतला आणि बिबट्याच्या पाठकुळी मांजराने ठाण मांडून जीव वाचविला.

शेवटी वाघाची मावशीच...  बिबट्या व मांजर दोघेही मांजरकुळातील प्राणी. दोघेही चपळ. शिकार करताना मांजर व बिबट्या विहिरीत पडले. मात्र, दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू होणार असे असताना दोघांनीही पोहत रात्र काढली. लोखंडी अँगलवर बिबट्या विसावल्यानंतर त्याने मावशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मांजराचाही जीव वाचवला. 

अशी सुटका..दोरखंडाच्या साहाय्याने विहिरीत एक जाळी सोडून अगोदर मांजराची सुटका केली. त्याने वर काढताच धूम ठोकली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा विहिरीत सोडल्यानंतर बिबट्याने पिंजऱ्यात उडी घेतली आणि दरवाजा बंद झाला. त्यानंतर अडीच ते तीन वर्षांच्या मादीला उपचारांसाठी सिन्नरजवळील मोहदरी वनउद्यानात आणण्यात आले.

त्याचे झाले असे... : पाठलाग महागात...

सिन्नर तालुक्यातील टेंभूरवाडी (आशापूर) येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास सावजाचा (मांजराचा) पाठलाग करीत असताना बिबट्या सुमारे  ७० फूट खोल विहिरीत पडला. विहिरीत सुमारे ५० फूट पाणी होते. त्यामुळे मांजर आणि बिबट्या दोघेही विहिरीत रात्रभर पोहत आपला जीव वाचवत राहिले. 

विहिरीत विद्युतपंप ठेवण्यासाठी बसविण्यात आलेल्या लोखंडी अँगलचा बिबट्याने आधार घेतला. रात्रभर पोहून थकल्यानंतर मांजरानेही अँगलकडे धाव घेतली. त्यानंतर जिवाची पर्वा न करता मांजराने बिबट्याच्या पाठकुळी बैठक मारली. दोघांचाही जीव धोक्यात असल्याने बिबट्या शांत बसला. 

रहिवाशांना विहिरीतून  बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज ऐकू आला.  त्यांनी विहिरीत डोकावून पहिल्यानंतर त्यांना लोखंडी अँगलवर  बिबट्या बसलेला दिसला. त्यांनी ताबडतोब  वनविभागाला माहिती दिली. सिन्नरच्या वनपरिक्षेत्र पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक