शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

दंड न भरताच पळविल्या ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 1:24 AM

मालेगाव : गेल्या आठवड्यात मनमाड चौफुली परिसरात व वºहाणे शिवारात अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी विनापरवाना व बनावट पावत्या तयार करून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या दहा ट्रक पकडल्या होत्या. पकडलेल्या ट्रक येथील तहसील आवारात उभ्या करण्यात आल्या होत्या; मात्र सोमवारी (दि. १९) रात्री वाळूमाफियांनी सुमारे ४४ लाख ६४ हजार ९२५ रुपयांची दंडाची रक्कम न भरताच तहसील आवारातून ट्रक पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देपकडलेल्या ट्रक येथील तहसील आवारात उभ्या करण्यात आल्या होत्या. तहसील आवारातून ट्रक पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला

मालेगाव : गेल्या आठवड्यात मनमाड चौफुली परिसरात व वºहाणे शिवारात अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी विनापरवाना व बनावट पावत्या तयार करून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या दहा ट्रक पकडल्या होत्या. पकडलेल्या ट्रक येथील तहसील आवारात उभ्या करण्यात आल्या होत्या; मात्र सोमवारी (दि. १९) रात्री वाळूमाफियांनी सुमारे ४४ लाख ६४ हजार ९२५ रुपयांची दंडाची रक्कम न भरताच तहसील आवारातून ट्रक पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी मालेगाव तहसीलदारांना संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकाºयांना वाहनांचे परवाने निलंबित करण्याचे पत्र दिले आहे. अपर जिल्हाधिकारी राऊत, देवळ्याचे तहसीलदार कैलास पवार व पथकाने गेल्या १३ व १७ मार्चला रात्री ९ वाजेच्या सुमारास येथील मनमाड चौफुली व वºहाणे शिवारात वाळू वाहतूक करणाºया वाहनांची तपासणी केली होती. या तपासणी मोहिमेत जळगाव जिल्हाधिकाºयांचा बनावट शिक्का व स्वाक्षरी असलेल्या पावत्या तयार करून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे दहा ट्रक आढळून आल्या होत्या. या कारवाईदरम्यान अपर जिल्हाधिकाºयांनी टीपी व बारकोड स्कॅन केला असता पावत्या बनावट आढळून आल्या. यावेळी महसूल विभागाने ट्रकसह दहाही ट्रकमधील ७७ ब्रास वाळू जप्त करून दहा ट्रकमालकांना ४४ लाख ६४ हजार ९२५ रुपयांचा दंड करण्यात आला होता. बाजारभावाच्या पाचपट म्हणजेच ८ ब्रासला चार लाख १३ हजार २२५, तर ७ ब्रास वाळूला ३ लाख ८६ हजार ३७५ रुपये दंड करण्यात आला होता. हा दंड भरण्यास वाळूमाफियांनी टाळाटाळ केली होती. जमा केलेल्या ट्रक...धुळ्याकडून मनमाडकडे अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाºया व तहसील आवारातून पळवून नेलेल्या ट्रकचे क्रमांक व त्यामधील वाळू ब्रासमध्ये असे - एमएच १८ एसी ८६८७ (८ ब्रास), एमएच १५ एजी ७०४० (८ ब्रास), एमएच ४१ एजी ०९५७ (८ ब्रास), एनएल ०१ के ५९०४ (८ ब्रास), एमएच १५ डीके ७४१६ (८ ब्रास), एमएच ४२ टी ०६८४ (७ ब्रास), एमएच १२ जीएफ ४१५६ (७ ब्रास), एमएच १८ बीए ७७२५ (८ ब्रास), एमएच १८ एए ७२५९ (८ ब्रास). अपर जिल्हाधिकारी राऊत यांनी देवळ्याचे तहसीलदार कैलास पवार व पथकाच्या मदतीने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाºया ट्रक पकडल्या होत्या. स्थानिक महसूल अधिकाºयांना या कारवाईपासून दूर ठेवले होते. पकडलेल्या ट्रकची दंडाची रक्कमही देवळा तहसील कार्यालयात भरण्यात येणार होती. असे असताना मालेगाव तहसील आवारातून ट्रक पळवून नेल्याचा हा पहिलाच प्रकार घडला आहे. तहसील आवारात उभ्या असलेल्या ट्रक पळवून नेणाºयांविरुद्ध व पंचनाम्यात ज्यांची नावे आहेत त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा करण्याचे आदेश मालेगाव तहसीलदारांना दिले आहेत. तसेच वाहनांचे परवाने निलंबित करण्याबाबतचे पत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांना दिले आहे. संबंधितांवर नियमानुसार कारवाई करून दंड आकारला जाईल.- लक्ष्मण राऊतअपर जिल्हाधिकारी, मालेगाव