शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या स्लिपर शिवशाहीतून ‘राजेशाही’ प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:45 IST

गत दोन महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून कोल्हापूर, नागपूर आणि इंदूरसाठी सुरू करण्यात आलेल्या स्लिपर कोच शिवशाही बसला जादा तिकीट दर, दीर्घकाळ प्रवास आदी विविध कारणांमुळे प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.

नाशिक : गत दोन महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून कोल्हापूर, नागपूर आणि इंदूरसाठी सुरू करण्यात आलेल्या स्लिपर कोच शिवशाही बसला जादा तिकीट दर, दीर्घकाळ प्रवास आदी विविध कारणांमुळे प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रिकाम्या बसमध्ये राजेशाही थाटाने प्रवास करण्याची संधी मिळत असून, ते खºया अर्थाने शाही प्रवासाचा अनुभव घेत असल्यासारखी परिस्थिती पहायला मिळत आहे.  राज्य परिवहन महामंडळाने लांब पल्ल्याच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी नाशिकहून नागपूर, कोल्हापूर व इंदूरसाठी वातानुकूलित स्लिपर कोच शिवशाही बस सुरू केल्या आहेत. या बसचे भाडे खासगी बसच्या तुलनेत २०० ते ८०० रुपयांनी जास्त असल्याने व बस प्रवासात मोठ्या प्रमाणात थांबे घेत असल्याने प्रवाशांनी या बसकडे पाठ फिरवली आहे. खासगी बसचे दर कमी असून, बस डायरेक जात असल्याने परिवहन महामंडळाच्या बसच्या तुलनेत कमी वेळेत पोहोचते. तेच परिवहन महामंडळाची बस मधले सर्व थांबे घेत असल्याने प्रवासाला वेळ लागत आहे. या तिन्ही ठिकाणी दररोज एक बस जात असून त्यापैकी कोल्हापूरसाठी सायंकाळी ८ वाजता, इंदूर व नागपूर बसची निघण्याची वेळ सायंकाळी ७.१५ ही आहे. नागपूरचे नाशिकहून अंतर ७५० किलोमीटर असून येऊन-जाऊन हा प्रवास १५०० किमीचा होतो. १० लिटर इंधनात ४.३ चे अ‍ॅव्हरेज पकडल्यास इंधन, चालकाचा पगार, टोल आदी खर्च धरून या फेºया तोट्यातच जात आहेत. एसी शिवशाही बससेवांचा खर्चही उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. अशीच गत इंदूर, कोल्हापूरचीदेखील आहे. हा संचित तोटा वाढत गेल्यास परिवहन महामंडळाचे गणित बिघडू शकते हे लक्षात घेऊन महामंडळाने काही बाबतीत बदल करणे गरजेचे असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.बसमधील सुविधास्लिपर कोच शिवशाही बस अधिकतर रात्रीच्या वेळी धावतात. या वातानुकूलित बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे आणि आगप्रतिबंधक यंत्रणाही आहे. भ्रमणध्वनी चार्जिंग, मोफत इंटरनेटची सुविधा आहे. प्रवाशांना ब्लँकेट, उशी मोफत मिळणार आहे. झोपण्याची व्यवस्था असलेल्या या बसमध्ये ३० आसन व्यवस्था आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ