शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाशे वर्षांच्या खंडू वस्ताद तालमीचे रुपडे पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 16:27 IST

येवल्याचे वैभव : भुजबळांकडून ३० लाखांंचा निधी मंजूर

ठळक मुद्दे१२५ वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेल्या या तालमीतील लाल मातीतून अनेक मल्लांनी राष्ट स्तरावर प्रतिनिधीत्व करत शहराची मान उंचावलेली आहे

येवला : ‘घर तेथे पहिलवान’ अशी ख्याती असलेल्या येवला शहरात शेकडो मल्ल घडविणाऱ्या सव्वाशे वर्षांपूर्वीच्या खंडू वस्ताद तालमीचे रुपडे पालटणार असून तालमीला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तालमीच्या कामासाठी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.येवला शहराचे खंडू वस्ताद तालमीशी अत्यंत जिव्हाळ्याचे असे नाते राहिलेले आहे. १२५ वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेल्या या तालमीतील लाल मातीतून अनेक मल्लांनी राष्ट स्तरावर प्रतिनिधीत्व करत शहराची मान उंचावलेली आहे. खुल्या आखाड्यात अथवा सार्वजनिक उत्सवात कुस्त्यांचे फड रंगवत खुले आव्हान देत काली कुस्ती करण्याचा पायंडा या तालमीने पाडला आहे. खंडू वस्ताद तालमीत टिल्लू पहिलवान, खानापुरे, परशराम पहिलवान,गोपाळदादा शिंदे, बळवंतदादा शिंदे, आनंदराव शिंदे, किसनराव शिंदे, माजी नगराध्यक्ष दिनकरराव शिंदे, काशिनाथ बापू शिंदे, विश्वनाथ शिंदे यांच्यासह अनेक मल्लांनी महाराष्टसह अन्य प्रांतातील विविध ठिकाणचे कुस्तीचे फड गाजविले आहे. अलीकडच्या काळात बाळू शिंदे, आबा शिंदे,भाऊ पहिलवान महाले, मुकेश गुजर ,सुरेश शिंदे यांनी मिनिटात चीतपट कुस्ती करण्याचे कसब अनेकदा सिद्ध केले आहे. या तालमीत युवकांना लाजवील अशा वयाच्या ९० व्या वर्षी सुद्धा मोठ्या जोशात मल्लविद्याचे प्रशिक्षण गुलाबराव पहिलवान महाले देत असतात. तालमीचे व्यवस्थापन गेल्या १५ वर्षांपासुन नगरसेवक गणेश शिंदे पाहत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत तालमीची पडझड होऊन दुरवस्था झालेली आहे. सदर तालमीत सुविधा पुरवविण्याची मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे गणेश शिंदे यांनी केली होती. त्यानुसार, भुजबळ यांनी तालमीच्या जिर्णोदद्धारसाठी ३० लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे तालमीचे रुप बदलण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकWrestlingकुस्ती