शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

शहरात कोरोनाचा कहर, जंगलात रानमेव्याला बहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:31 IST

त्र्यंबकेश्वर : मार्च-एप्रिल मध्ये वेध लागतात ते त्र्यंबकेश्वरच्या पश्चिम पट्ट्यातील जंगलसंपदा असलेल्या रानमेव्याचे ! जंगलातील करवंदापासून ते जांभळापर्यंत असा रानमेवा आता त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेत दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. मागील वर्षी लॉक डाऊनमध्ये या जंगलच्या रानमेव्याला आलेला बहर झाडावरच कोमेजला होता. आताही कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता हा रानमेवा बाजारात येईल की नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.

ठळक मुद्देबाजारात रानमेव्याची प्रतीक्षा : गतवर्षी लॉकडाऊनचा फटका

वसंत तिवडे,

त्र्यंबकेश्वर : मार्च-एप्रिल मध्ये वेध लागतात ते त्र्यंबकेश्वरच्या पश्चिम पट्ट्यातील जंगलसंपदा असलेल्या रानमेव्याचे ! जंगलातील करवंदापासून ते जांभळापर्यंत असा रानमेवा आता त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेत दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. मागील वर्षी लॉक डाऊनमध्ये या जंगलच्या रानमेव्याला आलेला बहर झाडावरच कोमेजला होता. आताही कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता हा रानमेवा बाजारात येईल की नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.या रानमेव्यामध्ये आकर्षण असते ते जंगलची काळी मैना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करवंदाचे.या करवंदांना कुणी जंगली द्राक्षेही म्हणतात. याबरोबरच हिरव्याकंच कैऱ्या, गावठी आवळे, बकुळी, तोरणे, काळी पिकलेली जांभळे, जंगली चिकू असा एक ना अनेक रानमेवा मार्च ते जूनपर्यंत बाजारात दाखल होत असतो. यामध्ये हिरवी करवंदे आंबट चवीची असतात. या करवंदांचे लोणचे बनवतात. या लोणच्याला शहरात हॉटेलमध्ये चांगली मागणी असते. काही लोक या हिरव्या करवंदाची भाजी देखील करतात. हिरव्या कैऱ्यांचा ठेचा तर जेवणाची रंगत वाढवतो. आवळापासून तर अनेक पदार्थ बनवतात. जांभुळ हे फळ आयुर्वेदिक असल्याने ते मधुमेहींसाठी उपयुक्त असते. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे या रानमेव्याची तोडच झालेली नव्हती. आताही कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हा प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे रानमेव्याला पुन्हा एकदा कोरोनाचा अडसर ठरतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.आंब्याचे दर वधारणारसध्या आंब्याला मोठ्या प्रमाणात बहर आला असून आंब्याची झाडे मोहोराने लगडली आहेत. त्यातून चिमुकल्या डोकावणाऱ्या हिरव्याकंच कैऱ्या लक्ष वेधून घेत आहेत. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आंब्याच्या मोहरालाही बसला होता. परंतु, यंदा आंब्याचे उत्पादन बऱ्यापैकी असले तरी दर वधारणार असल्याचे सांगितले जात आहे.फोटो- १८ करवंदे

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरRural Developmentग्रामीण विकास