शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशाची सोडत पुण्यातून जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:22 IST

आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी पहिली सोडत सोमवारी (दि.८) पुण्यातून जाहीर करण्यात आली आहे.

नाशिक : आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी पहिली सोडत सोमवारी (दि.८) पुण्यातून जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरातील आरटीई प्रवेशाच्या १ लाख १६ हजार ९२६ जागांची लॉटरी पद्धतीने प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात नाशिक जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या १४ हजार ९९५ अर्जांचाही समावेश असून जिल्ह्यातील ४५७ शाळांमध्ये यंदा ५ हजार ७६४ जागांवर ही प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे.दरवर्षी जिल्हा स्तरावर होणारी सोडत यंदा राज्यस्तरावर काढण्यात आली असून, संपूर्ण राज्यभरात ही प्रक्रिया एकाचवेळी राबविण्यात येत आहे. पुण्यात सोमवारी संपूर्ण राज्यभराची लॉटरी काढल्यानंतर बुधवारी (दि.१०) आरटीई प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या पालकांना त्यांच्या पाल्यांना सोडतीत संधी मिळाली किंवा कसे याविषयी मोबाइलवर मेसेज मिळणार आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी (दि.११) शहरात इंदिरानगर, नाशिकरोड, गंगापूररोड व पंचवटी भागातील एका शाळेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादीही प्रदर्शित करण्यात येणार आहे. पालकांनी एसएमएस व याद्यांवर अवलंबून न राहता पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशाची कार्यवाही सुरू करावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.पालकांनी ज्या शाळेत लॉटरी लागली आहे त्या शाळेजवळच्याच पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी करावी, सर्व कागदपत्रांच्या दोन प्रति तयार कराव्यात, त्यापैकी एक संच पडताळणी समितीककडे व दुसरा संच शाळेत सादर करावा यातील सर्व कागदपत्रं पडताळणी समितीकडून तपासून घ्यावीत, तसेच आपला आॅनलाइन प्रवेश झाल्याची पावती तथा अलॉटमेंट लेटर आणि प्रवेशाची कागदपत्र घेऊन दिलेल्या मुदतीत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहनही शिक्षण विभागाने केले आहे.मागील वर्षाच्या तुलनेत जागांमध्ये घटनाशिक जिल्ह्यात मागील वर्षी ४६६ शाळांमध्ये सहा हजार ५८९ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ११ हजार ११८ अर्ज आले होते. एकूण चार प्रवेश फेऱ्यांमध्ये ७ हजार १०८ बालकांची लॉटरी लागली. मात्र, त्यापैकी केवळ ४ हजार ६४६ विद्यार्थ्यांचाच प्रवेश होऊ शकला होता. जिल्ह्यातील ९ शाळांना २० टक्के अनुदान मिळाल्याने त्यांना आरटीई प्रवेशप्रक्रियेतून वगळण्यात आले असून, जागांची संख्या ५ हजार ७६४ वर आली आहे. त्यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्हाभरात ८२५ जागा कमी झाल्या आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा