शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४५० शाळांमध्ये शुक्रवारपासून आरटीई प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 01:12 IST

नाशिक : कोरोना संकटामुळे अन्य क्षेत्रांप्रमाणेत शिक्षण क्षेत्रही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून, लॉटरी जाहीर झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांपासून रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया शुक्रवार (दि. ११)पासून पुन्हा सुरू होणार आहे.

ठळक मुद्दे३० जूनपर्यंत मुदत : लॉटरीत ४५४४ जागांसाठी ४२०८ विद्यार्थ्यांची निवड

नाशिक : कोरोना संकटामुळे अन्य क्षेत्रांप्रमाणेत शिक्षण क्षेत्रही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले असून, लॉटरी जाहीर झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांपासून रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया शुक्रवार (दि. ११)पासून पुन्हा सुरू होणार आहे.

आरटीई अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांमधील ४५४४ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ७ एप्रिलला प्रवेशासाठीची सोडत जाहीर केली असून, सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून एसएमएसही प्राप्त झाले आहेत. सोडतीत राज्यातील ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, यात नाशिकमधील ४२०८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना लॉटरीत प्रवेशाची संधी मिळूनही कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया रखडली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या निर्बंधांमुळे ठप्प झालेली प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून पुन्हा सुरू होणार असून, या प्रवेश प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा निर्णय आपल्या स्तरावरून घेण्यात यावा, असे शिक्षण संचालकांनी म्हटले आहे.

दरम्यान, लॉटरीच्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता २० दिवसांचा कालावधी देण्यात येणार असून, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी शाळेत गर्दी करू नये, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.जिल्ह्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेची स्थितीजिल्ह्यातील शाळा - ४५०उपलब्ध जागा - ४५४४विद्यार्थ्यांचे प्राप्त अर्ज - १३, ३३०निवड झालेले विद्यार्थी - ४२०८.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी