मालेगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात मक्याची आवक चांगली होत आहे. शनिवारी झालेल्या लिलावात ओल्या मक्याला कमीत कमी एक हजार रुपये, जास्तीत जास्त १२७० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. कोरड्या मक्याला १३०० रुपये तर जास्तीत जास्त १५७० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे. मका उत्पादक शेतकऱ्यांनी मका मुख्य बाजार आवारात विक्रीसाठी आणावा तसेच शिवारपद्धतीने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समिती आवारातच मक्याची विक्री करावी, असे आवाहन बाजार समिती प्रशासनासह मका व्यापारी भिका कोतकर, तन्नू अग्रवाल, प्रवीण पहाडे, सुनील शिनकर आदिंनी केले आहे. (प्रतिनिधी)
मक्याला १५७० रुपये प्रतिक्विंटल भाव
By admin | Updated: October 16, 2016 01:12 IST