शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

शिक्षकांच्या फरकाचे ११ कोटी रुपये रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 16:15 IST

सिन्नर : पे युनिट कार्यालयाबाबत शिक्षकांचे पगार, फरकाची बिले, मेडिकल बिले याबाबत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी आल्या होत्या.

ठळक मुद्देबैठक: मुख्याध्यापक संघाकडून ह्यपे युनिटह्ण चा आढावा

सिन्नर : पे युनिट कार्यालयाबाबत शिक्षकांचे पगार, फरकाची बिले, मेडिकल बिले याबाबत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी आल्या होत्या.

त्याबाबत पे युनिटचे अधीक्षक उदय देवरे यांच्याकडून जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी. देशमुख, सुरगाणा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ए.जे. बागुल, उच्च माध्यमिकचे. प्रा. गांगुर्डे, घुले यांनी आढावा घेतला. मार्च २०२१ मध्ये नवीन कर्मचारी सोडले तर सर्व शाळांची ५५४ विविध प्रकारची फरकाची देयके मंजूर झालेली असून त्यांची एकूण ३० कोटी ४२ लाख रुपये एप्रिलमध्येच मुख्याध्यापकांच्या खाती जमा करण्यात आलेले आहेत.

मार्च २०२१ मध्येच माध्यमिक शाळांचे विनाअनुदानित कर्मचारी यांना सोडून इतर सर्व प्रकारची फरकाची १५७६ जणांची एकूण ११ कोटींची देयके ३१ मार्च रोजी मंजूर होऊन आली आहेत. मात्र सदर देयके काढण्यासाठी निधी नसल्याने निघू शकली नाहीत. सदर देयकांना निधीची व बिले काढण्यासाठीची व ऑफलाइनसाठीची परवानगी मागण्यात आलेली आहे.

नुकतेच जीपीएफचे परतावा, नापरतावा अंतिमच्या रकमांसाठी रक्कम आहरीत करण्यास पाच तासांची परवानगी आली होती. त्या काळात जिल्ह्यातील १४४ कर्मचारी यांची एकूण १६ कोटींची देयके ट्रेझरीत गेली असून लवकरच सदर रकमा जमा करण्यात येतील. सदर काम ९० टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती पे युनिट कार्यालयाकडून देण्यात आल्याचे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव देशमुख यांनी दिली.डीसीपीएसधारकांची देयके निधीअभावी लटकलीसातव्या वेतन आयोगाच्या प्रथम हप्त्याची जीपीएफची देयके मंजूर झालेली असून ती रक्कम जीपीएफमध्ये वर्ग केलेली आहे. सातव्या वेतन आयोगाची प्रथम हप्त्याची डीसीपीएसधारकांची रोखीने रक्कम द्यावयाची देयके तयार करण्यात आलेली होती. मात्र सदर खर्चास निधी नसल्याने काढता आलेली नाहीत. यासाठी आता निधी व ऑफलाइनला परवानगी मागण्यात आलेली आहे. सर्व रजाकालीन व रजारोखीकरणाची फरकाची देयकेही मार्चमध्येच मंजूर करून मुख्याध्यापकांच्या खाती जमा करण्यात आलेली असल्याची माहिती आढावा बैठकीत मिळाली.

टॅग्स :GovernmentसरकारTeacherशिक्षक