शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

एकलहरे वीज केंद्रात साकारली रोपवाटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:25 AM

नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातील रोपवाटिकेत सुमारे सोळा हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. पर्यावरण संवर्धन करण्यात अग्रेसर असलेल्या या केंद्रात प्लॅस्टिकमुक्त केंद्र, शून्य कचरा प्रकल्प, शून्य गळती प्रकल्प, ऊर्जा व जलसंवर्धन असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत.

एकलहरे : नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातील रोपवाटिकेत सुमारे सोळा हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. पर्यावरण संवर्धन करण्यात अग्रेसर असलेल्या या केंद्रात प्लॅस्टिकमुक्त केंद्र, शून्य कचरा प्रकल्प, शून्य गळती प्रकल्प, ऊर्जा व जलसंवर्धन असे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. शासनाने निर्धारित केलेले वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी अनेक योजना कार्यान्वित आहेत.एकलहरे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हजारो झाडे लावून हरितपट्टा निर्माण केला आहे. या वृक्षारोपणासाठी वनविभाग व सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेशिवाय खासगी रोपवाटिकेतून हजारो रोपे आणण्यात आली. परंतु यावर्षी जुलैमध्ये होणाºया वृक्षारोपणासाठी मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्या मार्गदर्शनाखाली वसाहतीतील स्थापत्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने अद्ययावत अशी रोपवाटिका तयार करण्यात आली आहे. अशाप्रकारे महानिर्मितीमध्ये रोपवाटिकाद्वारे हजारो झाडांची रोपे तयार करण्यात आल्याचा पहिलाच प्रयोग आहे. माती, खत व पाण्याचे योग्य नियोजन यांचा सुंदर मेळ घालून व सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी घरी जमा केलेल्या अनेक फळांच्या बियांपासून स्थापत्य विभागाने रोपे तयार केली आहेत.या रोपवाटिकेमध्ये शेवगा ७९८६, विलायती चिंच १४१०, आंबा १८०, फणस १७३०, सीताफळ ७००, करंज १०६०, आंबट चिंच १५८०, जांभूळ ८००, इतर (बेल, बेहड, वड) ३००, गुलमोहर ६००, बहावा १५० अशी एकूण १६,४९६ रोपे तयार केली आहेत. ही रोपवाटिका स्थापत्य विभागाचे अधीक्षक अभियंता मनोहर तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विवेक मोरे, प्राजक्ता घुले, सोमदत्त साठे, हरिष आहेर, संतोष येवले यांच्या अथक परिश्रमातून साकार झाली आहे.पर्यावरणाचा समतोलएकलहरे औष्णिक विद्युत केंद्र हे पर्यावरण संवर्धन केंद्र म्हणून महानिर्मिती-मध्ये आदर्श ठरत आहे. या केंद्रात प्लॅस्टिकमुक्ती, शून्य कचरा, शून्य गळती, ऊर्जा व जलसंवर्धन, वृक्षारोपण, विविध विभागांत उद्याने अशा अनेक उपक्रमांमुळे राज्यभरात या वीज केंद्राचे नाव झाले आहे. येत्या पावसाळ्यात विविध प्रकारची रोपे येथेच तयार करून वृक्षलागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प आहे. यासाठी अधिकारी, कर्मचारी, कामगार व परिसरातील नागरिकांचे सहकार्य मिळत आहे.- उमाकांत निखारे, मुख्य अभियंता,  एकलहरे वीजनिर्मिती केंद्र

टॅग्स :Nashikनाशिक