नाशिक : दुचाकीवर येऊन लुटणाऱ्या चोरट्यांची चांगली हिंमत वाढली असून, सातपूर शिवाजीनगरमधील एका इसमास शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याकडील रोकड बळजबरीने लुटून नेल्याची घटना रविवारी (दि़ ०८) भरदुपारी महात्मानगर परिसरात घडली़ गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीप रामदास सूर्यवंशी (२५, रा़ सुवर्ण रो़ हाऊस, कार्बननाका, शिवाजीनगर, सातूपर) हा युवक दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एबीबी सर्कलजवळील वैशंपायन शाळेसमोरून दुचाकीवरून जात होता़ त्यावेळी पल्सर दुचाकीवर आलेल्या संशयिताने त्यास बोलण्यात गुंतविले, तर दुसऱ्याने मानेस धारदार शस्त्र लावून त्याच्याकडील ६४ हजार २०० रुपये असलेली बॅग लुटून नेली़या प्रकरणी सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांनी जबरी लुटीचा गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, पोलिसांनी शहरातील चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़ (प्रतिनिधी)
शस्त्राचा धाक दाखवून जबरी लूट
By admin | Updated: November 9, 2015 22:55 IST