नाशिक : हॉटेलमधील काम आटोपून घरी पायी जाणाऱ्या कामगारावर चाकूने वार करून त्याच्याकडील ऐवज लुटून नेल्याची घटना गुरुवारी (दि़८) मध्यरात्रीच्या सुमारास कृषीनगर परिसरात घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र राजेंद्र भट (२६, मूळ रा. नेपाळ, हल्ली सह्याद्री अर्पा. महात्मानगर) हे गंगापूर रोडवरील हॉटेल अप डेक येथे कामास आहेत. हॉटेलमधील काम आटोपून भट हे कृषीनगरमार्गे महात्मानगरला पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना अडवले़ यानंतर दोघांनी शिवीगाळ करून त्यांच्या पायावर चाकूचे वार केले़ तर तिसऱ्याने त्यांच्या खिशातील पाकीट, मोबाइल असा सुमारे दीड हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून फरार झाले़ याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात या तीन संशयितांविरोधात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
चाकूचा धाक दाखवून लूट
By admin | Updated: September 11, 2016 01:45 IST