शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

मुस्लिम आरक्षणासाठी महामार्गावर रस्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 6:27 PM

मालेगाव : आगामी बोलावण्यात येणाºया विशेष अधिवेशनात मराठासह मुस्लिम समाजासही पाच टक्के आरक्षणाचा समावेश करीत त्यास मंजुरी द्यावी या प्रमुख मागणीसाठी मालेगावी आज दुपारी तीन वाजता गिरणापुल येथे महामार्गावर मुस्लिम रिझर्वेशनतर्फे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व आमदार आसिफ शेख यांनी केले. प्रांताधिकारी अजय मोरे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

ठळक मुद्देमुस्लिम रिझर्वेशन फेडरेशनचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

मालेगाव : आगामी बोलावण्यात येणाºया विशेष अधिवेशनात मराठासह मुस्लिम समाजासही पाच टक्के आरक्षणाचा समावेश करीत त्यास मंजुरी द्यावी या प्रमुख मागणीसाठी मालेगावी आज दुपारी तीन वाजता गिरणापुल येथे महामार्गावर मुस्लिम रिझर्वेशनतर्फे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व आमदार आसिफ शेख यांनी केले. प्रांताधिकारी अजय मोरे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.आंदोलक सुमारे ४० मिनीटे रस्त्यावर ठाण मांडून होते. मुस्लिम रिझर्वेशन फेडरेशनच्या वतीने मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी २०१३ मध्ये मालेगाव ते मुंबई पदयात्रा काढून सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १६ जुलै २०१४ रोजी मराठा समाजास १६ टक्के व आर्थिक रुपाने मागासलेल्या मुस्लिम समाजातील ५० पोटजातींना ५ टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश जारी केला होता. या दोन्ही आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने सर्व आरक्षण रद्द करीत मुस्लिम समाजास शिक्षणात ५ टक्के आरक्षण कायम ठेवले होते. परंतु सत्तांत्तर होऊन भाजपचे सरकार सत्तारुढ झाले. कॅबिनेटच्या निर्णयापश्चात सहा महिन्यात दोन्ही सभागृहात विधेयक सादर करुन मंजुर करणे क्रमप्राप्त असते त्यानुसार भाजपा सरकारने मराठा समाजाचे आरक्षणाचे विधेयक सभागृहात मांडून मंजुर करुन घेतले परंतु मुस्लिम समाजास उच्च न्यायालयाने कायम केलेले शैक्षणिक आरक्षणाचा मुद्दाही भाजप सरकारने लावून न धरता मुस्लिमांना आरक्षणाबाबत डावलण्यात आले. त्यामुळे समाजात नाराजी पसरली. मुस्लिम समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक बाबींचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने राजेद्रसच्चर कमिटी, मा. न्यायाधिश रंगनाथ मिश्रा कमिटी व राज्य सरकारने डॉ. महेमुद रहेमान कमिटीची स्थापना केली होती.या तिन्ही आयोगाच्या सर्वेक्षण अहवालानुसार मुस्लिम समाजाची स्थिती मागासप्रवर्ग पेक्षाही दयनीय आहे. म्हणून मुस्लिम समाजास आरक्षण देणे अत्यावश्यक आहे. आज राज्यात मुस्लिम समाजाची लोकसंख्या १३ टक्के आहे तर तुरुंगात ३६ टक्के आहे. आर्थिक परिस्थिती नसल्याने काही तरुण शिक्षणापासून वंचीत राहतात. काहींन शिक्षण अजुनही आरक्षणाअभावी नोकरी मिळत नसल्याने समाजात बेरोजगारांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे अनेक तरुण वाममार्गावर जात आहे. या परिस्थितीस सरकारच जबाबदार असल्याचा आरोप आमदार शेख यांनी केला.आगामी विशेष अधिवेशनात मराठा समाजा बरोबर मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विधेयकात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन छेडण्याचा निर्धार आमदार शेख यांनी केला. रास्तारोको आंदोलनापूर्वी महामार्गालगतच्या तहेजीब हायस्कुलच्या प्रांगणावर सर्व मुस्लिम बांधव जमले होते. येथेच महापौर रशीद शेख, मौलाना ईस्माईल जमाली, एजाज उमर, अनिस अझहर, शफीक राणा, जमील क्रांती, अ‍ॅड. हिदायतउल्ला यांची भाषणे झाली. यावेळी पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, अजित हगवणे, पोलीस निरीक्षक मसुद खान, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, गिरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :reservationआरक्षणMalegaonमालेगांवMuslimमुस्लीम