रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 01:07 PM2020-01-14T13:07:52+5:302020-01-14T13:07:59+5:30

नांदूरवैद्य : रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो.याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील गोंदे फाटा येथे वाडिव-हे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या हस्ते राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ गोंदे दुमालाच्या पोलीस पाटील शैला नाठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

 Road Safety Week launches mission | रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाचा शुभारंभ

रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानाचा शुभारंभ

Next

नांदूरवैद्य : रस्त्यावरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो.याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील गोंदे फाटा येथे वाडिव-हे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या हस्ते राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ गोंदे दुमालाच्या पोलीस पाटील शैला नाठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाप्रसंगी जाधव यांनी रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शन करतांना सांगितले की, आपल्या अधिकार व हक्कांबाबत नागरिक जागृत असतात. ते असायलाही हवे. माञ कर्तव्यांबाबत आपण फारसे गंभीर दिसत नाही.कायद्याचे कसोशिने पालन करणे हे सुद्धा आपले मुलभूत कर्तव्यच आहे.मोटरवाहन कायदा हा आपल्यासाठीच असून रस्ता सुरक्षा आपल्या जगण्याचा भाग व्हावा असे प्रतिपादन गोंदे फाटा येथे आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाप्रसंगी पोलिस निरीक्षक जाधव यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले.
. याप्रसंगी गोंदे दुमालाचे माजी सरपंच रमेश जाधव, माजी सरपंच कारभारी नाठे, माजी उपसरपंच कमलाकर नाठे, आत्माराम फोकणे, ग्रामपंचायत कर्मचारी सुनिल नाठे, रूंजा धोंगडे, प्रकाश नाठे, वाडिव-हे पोलिस स्टेशनचे कर्मचारी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title:  Road Safety Week launches mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक