पेठ : सन २०१८ मधील रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या हस्ते येथील जुन्या बस स्टॅण्ड परिसरात आज करण्यात आला. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्यात अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यंदा त्यानुषंगाने पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी काळी-पिवळी टॅक्सीचालक-मालक यांना रस्ता सुरक्षेबाबत घ्यावयाची काळजी व नियमांचे पालन करण्याविषयी मार्गदर्शन करून रस्ता सुरक्षा मार्गदर्शिकेचे वाटप केले. त्याबरोबर या सप्ताहात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यात चालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे भागवत यांनी सांगितले.
रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:17 IST