शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

महापौर रंजना भानसी यांच्या प्रभागामधील कलानगरला रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:07 IST

शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर रंजना भानसी यांच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये असलेल्या कलानगर लेन क्रमांक ६ मधील रस्त्याची पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना चिखलातूनच वाट काढावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

पंचवटी : शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर रंजना भानसी यांच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये असलेल्या कलानगर लेन क्रमांक ६ मधील रस्त्याची पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना चिखलातूनच वाट काढावी लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.  दिंडोरी रोडवरील प्रभाग क्रमांक १ मध्ये असलेल्या कलानगर येथील लोकवस्ती दाट असून, याच कलानगर लेन क्र मांक ६ मध्ये असलेल्या रस्त्याचे काही वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनातर्फे खडीकरण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर प्रशासनाने रस्त्याचे डांबरीकरण न केल्याने व सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर गाळाचे साम्राज्य पसरलेले असल्याने आणि त्यातच नागरिकांना या रस्त्याने ये-जा करावी लागत असल्याने शहरापेक्षा खेड्यातील रस्ते बरे असे म्हणण्याची वेळ परिसरात राहणाºया नागरिकांवर आली आहे.  पावसामुळे कलानगर लेन ६ मधील रस्त्यावरची खडी उखडली गेली असून, पावसाचे पाणी साचल्याने खड्डे तयार झालेले आहेत.  याशिवाय या रस्त्यावर चिखल व गाळाचे साम्राज्य पसरले असून शाळकरी विद्यार्थी, नोकरदार व परिसरातील नागरिकांना रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. महापालिका प्रशासन एकीकडे स्मार्ट सिटी म्हणून नाशिक शहराचा उल्लेख करत असली तरी दुसरीकडे मात्र खुद्द महापौरांच्या प्रभागातील रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने प्रशासनाने तत्काळ या रस्त्याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.आडगाव-म्हसरूळ रस्ता धोकादायकआडगाव-म्हसरूळ ओंकार फार्मजवळील नाल्यावरील रस्त्याचा संरक्षक कठडा मागीलवर्षी पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने रस्त्याच्या जवळ नाला तयार झाला असून, या वळणावर अनेक छोटे-मोठे  अपघात होतात; पण या समस्येकडे स्थानिक नगरसेवक व प्रशासन यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वळणावरील रोडवर संरक्षक  कठडा बांधून नाला बुजविण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. ओंकार फार्मजवळील संरक्षक कठडा मागीलवर्षी पुराच्या पाण्यामुळे कोसळून बाजूची माती वाहून गेल्याने रस्त्यालगत नाला तयार झाला आहे. त्यामुळे सर्व वाहनधारकांची अनेक वेळा तारांबळ उडते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका