शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

देवळालीतील रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 00:58 IST

देवळाली छावणी परिषद हद्दीतील गजानन महाराज मंदिर, संविधान बंगला तसेच सैनिक सोसायटीच्या परिसरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून, नागरिकांना चिखलातून मार्ग काढत जावे लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

भगूर : देवळाली छावणी परिषद हद्दीतील गजानन महाराज मंदिर, संविधान बंगला तसेच सैनिक सोसायटीच्या परिसरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून, नागरिकांना चिखलातून मार्ग काढत जावे लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी देवळाली छावणी परिषद हद्दितील नागरिकांनी केली आहे.भगूरलगत देवळाली कॅम्प हद्दीतील उच्चभ्रू वस्ती म्हणून हजारो विविध जाती, धर्माचे नागरिक बंगले, विविध सोसायट्यांमध्ये राहतात, परंतु येथील नागरिकांना बिल्डर अथवा देवळाली छावणी परिषदेने रस्ताच तयार करून दिलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचून चिखलमय परिसर तयार होतो तसेच यातूनच येणे-जाणे करावे लागते.गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिक देवळाली छावणी परिषदेला मोठ्या प्रमाणात घरपट्टी, पाणीपट्टी कर भरतात. यात प्रभाग क्र मांक आठ म्हणून नागरिक मतदान करतात व निवडून आलेले प्रतिनिधी फक्त आश्वासन देतात. मात्र रस्त्यांची समस्या सोडवत नाही तर बिल्डर बंगला, सोसायटी, घरांचे लाखो रुपये वसूल करतात. परंतु कुठल्याही सुविधा देत नाही तर दाद कुठे मागावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी येथील नगरसेवकांनी देवळाली छावणी परिषदेत आवाज उठवून डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करून रस्त्यांचा विकास करावा, अशी मागणी लोकांनी केली आहे. समस्या माहिती असूनही रस्ते विकास होत नसल्याने अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. याभागात तातडीने रस्ते तसेच अन्य सुविधा उपलब्ध करुन द्यावीत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही नागिरकांनी दिला आहे.तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणीदेवळाली छावणी परिषद वसाहतीमध्ये देवळाली छावणी परिषदेने रस्ताच तयार करून दिलेला नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचून चिखलमय परिसर तयार होतो तसेच यातूनच येणे-जाणे करावे लागते.४येथील नागरिक देवळाली छावणी परिषदेला मोठ्या प्रमाणात घरपट्टी, पाणीपट्टी कर भरतात. मात्र अनेक गैरसोयी आहेत. रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून, नागरिकांना चिखलातून मार्ग काढत जावे लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी देवळाली छावणी परिषद हद्दीतील नागरिकांनी केली.

टॅग्स :Nashikनाशिक