शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

गडावर दगड पडल्याने रस्ता बंद

By admin | Updated: July 12, 2016 00:04 IST

पाच ठिकाणी पडझड : कळवण तालुक्यात दोन म्हशी, दोन गायी वाहून गेल्या

कळवण : शहर व तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, गिरणा, तांबडी, बेहडी, मार्कडी, म्हश्याड या नद्यांना पूर आला आहे. गोळाखाल येथे पाण्याच्या ओढ्यात दोन म्हशीव दोन गायी वाहून गेल्या होत्या, परंतु तपासाअंती त्यांचा शोध लागला. रविवारी तालुक्यात २४० मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. सप्तशृंगगडावरील मंदिराच्या उतरीच्या मार्गावर दगड कोसळल्याने मार्ग बंद करण्यात आला आहे.चणकापूरच्या लाभक्षेत्रात चार-पाच दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने पूरपाण्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे गिरणा नदीपात्रात पाणीचा विसर्ग करण्यात आला असून, गिरणा नदीला पूरपाणी आला आहे, तर चणकापूर उजव्या कालव्यात पूरपाणी सोडण्यात आले आहे. दळवट परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेती व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दळवट येथील तांबडी नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने दळवट ते कोसुर्डे रस्त्याचा संपर्क तुटला आहे. संततधारेमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.सप्तशृंगगडावर जाणाऱ्या पायऱ्यावर उतरतीच्या मार्गावर दगड कोसळल्याने उतरण्याचा मार्ग बदलण्यात आला आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ब्रकरने दगड फोडण्याची व्यवस्था श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने केली आह,े अशी माहिती व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली. नांदुरी येथून सप्तशृंगगडावर जाण्यासाठी घाटातील मुख्य रस्त्यावर तुरळक दरड कोसळल्याने दगड पडले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाला वाहतुकीच्या मार्गावर वाहतुकीस निर्माण होईल हे लक्षात घेऊन रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याच्या सूचना तहसीलदार कैलास चांवडे यांनी दिल्या आहेत. मौजे हिंगवे शिवारातील शिवार रस्ता मुसळधार पावसामुळे रविवारी पाण्यात वाहून गेला होता. सोमवारी तातडीने जेसीबीद्वारे लोकसहभागातून रस्ता पूर्ववत करण्यासाठी महसूल विभाग यंत्रणेने पाठपुरावा केला आहे. दळवट, अभोणा व कनाशी परिमंडळात सर्वाधिक पाऊस पडला असल्याने या भागात शेतीचे व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या तक्रारी आदिवासी बांधवांनी केल्याने तहसीलदार कैलास चांवडे यांनी या भागाचा दौरा केला असून, संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या आहेत. (वार्ताहर)