लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : एकापाठोपाठ कोरोनाचे १० रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागात दहशत पसरली आहे. मालेगावात कोणत्या न कोणत्या कारणाने येणाऱ्या परिसरातील ग्रामस्थांनी गावाबाहेर पडणे बंद केले आहे. तालुक्यातील खडकी येथील तरुणांनी तर एकत्र येत गावाकडे येणारे सर्व रस्ते बंद करून टाकले आहेत.गावातील तरुणांनी बाभळीची झाडे तोडून सर्व रस्त्यांवर टाकून रस्ते बंद केले आहेत. आता बाहेरगावच्या सहसा कुणालाही गावात येऊ दिले जात नाही वा गावातून कुणीही घराबाहेर पडत नाही.खडकी परिसरातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय आहे. त्यांना मालेगावात लोकांना दूध वाटप करण्यासाठी जावे लागत असते, मात्र आता गावातून कुणाला बाहेरगावी जाताच येत नसल्याने शेतकºयांचे मोठे हाल होत आहे. हजारो लिटर दूध वाया जात असल्याचे नाळे येथील शेतकरी देवा लामखेडे यांनी सांगितले. टवाळखोरांवर कारवाईची मागणीमालेगाव शहरातील आयोध्यानगरमध्ये विविध ठिकाणी रस्त्यांवर स्थानिक चौकाचौकात बसणाºया टवाळखोरांकडून काटे टाकून रस्ता बंद करण्यात येत आहे. यामुळे या भागात राहणाºया नागरिकांचेही हाल होत आहेत. भविष्यात आपत्कालीन परिस्थितीसाठी हे योग्य नाही. छावणी पोलिसांनी त्वरित लक्ष घालून रस्ता मोकळा करून टवाळखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरीक करीत आहेत.
खडकीत तरूणांनी केले रस्ते बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 00:10 IST
मालेगाव : एकापाठोपाठ कोरोनाचे १० रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागात दहशत पसरली आहे. मालेगावात कोणत्या न कोणत्या कारणाने येणाऱ्या परिसरातील ग्रामस्थांनी गावाबाहेर पडणे बंद केले आहे. तालुक्यातील खडकी येथील तरुणांनी तर एकत्र येत गावाकडे येणारे सर्व रस्ते बंद करून टाकले आहेत.
खडकीत तरूणांनी केले रस्ते बंद
ठळक मुद्देगावातून कुणीही घराबाहेर पडत नाही.