शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अनुवादातून भाषांशी रियाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:29 IST

मूळ लेखक त्याची भाषा, अनुभव आणि अनुवादाची भाषा या चार गोष्टींची सांगड घालण्याचे काम अनुवादक करत असतो; मात्र हे करताना अनुवादकाने नेहमी अदृश्य राहून भाषेवर विशेष लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे ठरते. अनुवादातून विविध भाषांशी सुंदर रियाज करता येतो. अनुवाद करताना मूळ लेखकाचा मालकी हक्क विसरता कामा नये, असे मत ‘लोकमत’च्या फिचर एडिटर व सावानाच्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्ष अपर्णा वेलणकर यांनी मुलाखतीतून मांडले.

ठळक मुद्देअपर्णा वेलणकर : जिल्हा साहित्यिक मेळाव्यात मुलाखतीतून उलगडला प्रवास

नाशिक : मूळ लेखक त्याची भाषा, अनुभव आणि अनुवादाची भाषा या चार गोष्टींची सांगड घालण्याचे काम अनुवादक करत असतो; मात्र हे करताना अनुवादकाने नेहमी अदृश्य राहून भाषेवर विशेष लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे ठरते. अनुवादातून विविध भाषांशी सुंदर रियाज करता येतो. अनुवाद करताना मूळ लेखकाचा मालकी हक्क विसरता कामा नये, असे मत ‘लोकमत’च्या फिचर एडिटर व सावानाच्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्ष अपर्णा वेलणकर यांनी मुलाखतीतून मांडले.सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या वतीने सुरू असलेल्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.१४) प्रा. वृंदा भार्गवे यांनी वेलणकर यांची प्रकट सर्वस्पर्शी मुलाखत घेतली. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात वावरण्याची मिळालेली संधी, पत्रकारितेचा प्रवासापासून अनुवादक आणि संपादकापर्यंतच्या विविध टप्प्यांना स्पर्श करत सामाजिक प्रश्न व समस्यांवर विविध प्रश्नांची उत्तरे देताना वेलणकर यांनी धांडोळा घेतला. यावेळी वेलणकर यांनी पत्रकारितेचा प्रवासाचा आरंभ सांगताना ज्येष्ठ पत्रकार व गुरूवर्य दत्ता सराफ यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.अकरावीला असताना त्यांनी कोल्हापूरमध्ये एक लेख लिहिण्यास सांगितले आणि तेथून माझ्या जीवनाच्या प्रवासाला वेगळे वळण मिळाले, असे त्या म्हणाल्या. इंग्रजीमधील शोभा डे यांचे सिलेक्टिव मेमरी हे पुस्तक वाचत असताना त्याचे मराठीत अनुवाद करावेसे वाटले. त्यानंतर मी एके का पुस्तकाचे अनुवाद करत गेले. अनुवादक वाचकांना दिसता कामा नये. अनुवादाची भाषा जरी मराठी असली तरी लिखाण करणाºया व्यक्तिमत्त्वानुसार ती घडवावी लागते. अनुवाद एका भाषेमधून दुसºया भाषेचा प्रवास असल्याचे वेलणकर यांनी यावेळी सांगितले.समाधान देणारेललित लेखन कमी झाले‘दीपोत्सवा’बाबत भार्गवे यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या, कथा, कविता, कादंबरी या साहित्याचे मला अजिबात वावडे नाही; मात्र वाचकांचे समाधान करणारे दर्जेदार ललित लेखन कमी झाले आहे, अशी खंत वेलणकर यांनी यावेळी व्यक्त केली. काळानुरूप दिवाळी अंकाचे स्वरूप बदलणे स्वाभाविक होते. अन्य दीवाळी अंक आणि ‘दीपोत्सव’ यांची तुलना करणे त्या दिवाळी अंकांवर अन्यायकारक ठरणारी असेल. दिवाळी अंकाचे महत्त्व हे त्यांच्या ठिकाणी तसेच असल्याचेही वेलणकर यांनी यावेळी सांगितले....तर पत्रकारितेची वाट धरावीउत्सुकता, नावीन्यतेचा शोध घेण्याची वृत्ती पत्रकाराकडे असली पाहिजे. यापैकी एकही उणीव जर असेल तर त्या व्यक्तीने पत्रकारितेची वाट स्वीकारणे चुकीचे होईल, त्यामुळे नव्या पिढीच्या पत्रकारांनी आपल्या मनाची तयारी करून कष्ट, जिद्द, उत्सुकता नावीन्यता हे गुण आत्मसात करून पत्रकारिता क्षेत्रात पाऊल ठेवायला हवे, असा मौलिक सल्लाही‘#मी टू’ चळवळीविषयी चिंता वाटतेस्त्रियांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविषयी धिटाईने समाजापुढे येऊन व्यक्त होण्याची ‘#मी टू’ नावाची चळवळ देशभरात सुरू झाली आहे. मनोरंजनाच्या दुनियेतील तारकेपासून या चळवलीला आरंभ झाला; मात्र या चळवळीविषयी मला चिंता वाटते, असेही वेलणकर यांनी ‘#मी टू’बाबतीत सांगितले. स्त्रियांचा हा लढा शोषण, छळाविरुद्ध असायला हवा; मात्र दुर्दैवाने पुरुषांविरोधी असल्याचे दिसून येते. या चळवळीच्या माध्यमातून वयात येणाºया मुलींसमोर आपण समाजातील पुरुषांविषयीची कोणत्या प्रकारची प्रतिमा उभी करत आहोत? याचाही विचार होणे गरजेचे आहे.

टॅग्स :literatureसाहित्यcultureसांस्कृतिक