शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

दारणा नदीची पूरस्थिती अद्याप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 00:55 IST

जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच नद्यांना पूर आला आहे. दारणा धरण परिसरात रविवारी मुसळधार पाऊस कायम होता त्यामुळे धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे नदीने धोकादायक पातळी ओलांडली.

नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच नद्यांना पूर आला आहे. दारणा धरण परिसरात रविवारी मुसळधार पाऊस कायम होता त्यामुळे धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे नदीने धोकादायक पातळी ओलांडली. त्यामुळे चेहेडी, पळसे, शिंदे परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याचे दिसून आले. सोमवारी (दि.५)देखील ही परिस्थिती कायम असल्याचे चित्र परिसरात दिसून आले.रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दारणा धरणातून दुपारी ४ पर्यंत ३९२५० क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत होते. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.तसेच चेहेडी गावातील नाशिक-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलाला पुराचे पाणी लागल्यामुळे सदर पूल बंद करण्यात आला. त्यामुळे नवीन पुलाची दुसरी बाजू खुली करण्यात आली. सोमवारीदेखील या पुलाला पाणी लागत असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा पूल बंदच ठेवण्यात आला आहे. सोमवारी दारणा धरण परिक्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, धरणातून दुपारी चारपर्यंत ३७५९६ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून, दारणेच्या पाणीपातळीतील धोकादायक स्थिती कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी या पुलावरुन रहदारी करु नये असे आवाहन करण्यात आले होते.वाहतूक बंद ठेवण्याची मागणीपावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याची पातळी अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या अनेक रहिवाशांची घरे अजूनही पाण्यात आहेत. पुरामुळे चेहेडी शिवार परिसरातील नागरिकांना या ठिकाणी मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. तसेच स्थानिक रहिवाशांनी दारणा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी कायमचा बंद ठेवण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयRainपाऊस