शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आकस्मिक किडनी विकाराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:20 IST

आॅर्गन ट्रान्सप्लांट करताना आकस्मिकपणे किडनीचे कार्य बंद झाले तर रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण तीन पटीने अधिक वाढते, यासाठी कोणती दक्षता घेता येऊ शकते आणि काय पूर्वतयारी करता येऊ शकेल याबाबतचे संशोधन नाशिकचे डॉक्टर चारुहास ठकार यांनी अमेरिकेत केले आहे. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी आॅफ सिसिनाटीमध्ये संशोधकांच्या चमूने ‘अक्युट किडनी फेल्युअर’ या विषयावर दहा वर्षे संशोधन करून काही निष्कर्ष काढले आहेत.

नाशिक : आॅर्गन ट्रान्सप्लांट करताना आकस्मिकपणे किडनीचे कार्य बंद झाले तर रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण तीन पटीने अधिक वाढते, यासाठी कोणती दक्षता घेता येऊ शकते आणि काय पूर्वतयारी करता येऊ शकेल याबाबतचे संशोधन नाशिकचे डॉक्टर चारुहास ठकार यांनी अमेरिकेत केले आहे. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी आॅफ सिसिनाटीमध्ये संशोधकांच्या चमूने ‘अक्युट किडनी फेल्युअर’ या विषयावर दहा वर्षे संशोधन करून काही निष्कर्ष काढले आहेत. नाशिकचे डॉ. चारुहास ठकार नेतृत्वाखालील चमूने केलेल्या संशोधनात ‘किडनी फेल्युअर’ विषयावर अनेक उपाय मांडण्यात आले आहेत. चमूतील तीन डॉक्टर्स भारतीय असून, डॉ. ठकार हे त्यातील एक आहेत. अवयव प्रत्यारोपण करताना रुग्णाची किडनी (मूत्रपिंड) बंद पडण्याचा धोका असतो. ते टाळण्यासाठी उपचाराच्या क्रमाची फेरमांडणी आणि उपाय या संशोधनात मांडले आहेत. डॉक्टर चारुहास ठकार हे अमेरिकेत नेफ्रॉलॉजिस्ट (किडनी विकारतज्ज्ञ)म्हणून परिचित असून, गेल्या २८ जुलै रोजी त्यांचे अवयव प्रत्यारोपण आणि किडनीची काळजी’ या विषयावरील संशोधन विद्यापीठाने जाहीर केले आहे. त्यांनी सुचविलेले उपाय हे ‘चारुहास ठकार प्रोटोकॉल’ म्हणून मान्य झाले आहे. अवयव प्रत्यारोपण विशेषत: हृदय आणि यकृत प्रत्यारोपण करताना आकस्मिक रुग्णाची किडनी फेल झाली, तर रुग्ण दगावण्याचा धोका तीन पटीने वाढतो. मूळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बाजूला राहते आणि किडनीने काम बंद केल्यामुळे शरीरातील इतर अवयवांवर परिणाम होतो आणि रुग्ण चिंताजनक अवस्थेत जातो. सिनसिनाटी विद्यापीठात याबाबतचे संशोधन सुरू करण्यात आले होते. यामध्ये डॉ. ठकार यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. अवयवप्रत्यारोपण करताना किडनी फेल्युअर होऊ नये म्हणून डॉ. ठकार यांनी काही प्रोटॉकॉल मांडले आहेत. अवयवप्रत्यारोपण करताना विशिष्ट प्रकारचे ड्रग्ज आणि काळजीच्या काही मेथड मांडल्या आहेत. अवयव प्रत्यारोपणापूर्वीच किडनीची काळजी, त्याबाबतची पद्धत, औषधोपचार आणि उपाय याबाबतचे संशोधन मांडण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधात्मक औषधे आणि मॉडिफाइड औषधे सुचविली आहेत. गेल्या दहा वर्षांत १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा अभ्यास करून ‘अक्युट किडनी फेल्युअर’ संशोधन करण्यात आले आहे. युनिव्हर्सिटीच्या हेल्थ न्यूजमध्ये हे संशोधन जाहीर करण्यात आले असून ‘अमेरिकन सोसायटी आॅफ नेफरॉलॉजी’ संघटनेनेही त्यांचे हे संशोधन प्रकाशित केले आहे. या संघटनेने जगभर पंधरा हजार किडनीविकारतज्ज्ञ आहेत. डॉ. चारुहास ठकार हे नाशिकचे असून, एम.डी. मेडिसिन डॉ. विनय ठकार यांचे चिरंजीव आहेत. गेल्या वीस वर्षांपासून डॉ. चारुहास अमेरिकेत असून, त्यांनी आत्तापर्यंत अनेक संशोधन केले आहे. अमेरिकेच्या सिसिनाटी विद्यापीठात ते मूत्रपिंडशास्त्र विषय शिकवितात.चारूहास ठकार प्रोटोकॉलया संशोधनात डॉ. ठकार यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. अवयवप्रत्यारोपण करताना किडनी फेल्युअर होऊ नये म्हणून डॉ. ठकार यांनी काही प्रोटॉकॉल मांडले आहेत. विशिष्ट प्रकारचे ड्रग्ज आणि काळजीच्या काही मेथड मांडल्या आहेत. या मेथडला ‘डॉ. चारूहास ठकार प्रोटोकॉल’ असे विशेषण देण्यात आले आहे.