शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

ऋषी कपूर यांची नाशिकमधील धर्मस्थळांवरही श्रद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 23:22 IST

नाशिक : बॉलिवूड स्टार ऋषी कपूर यांच्या निधनामुळे नाशिकमधील चाहत्यांनादेखील मोठा धक्का बसला आहे.

नाशिक : बॉलिवूड स्टार ऋषी कपूर यांच्या निधनामुळे नाशिकमधील चाहत्यांनादेखील मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी आपल्या चॉकलेट हिरोच्या सोशल मीडियावर आठवणी जागवल्या. ऋषी कपूर हे धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने नाशिकमध्ये चित्रीकरणा व्यतिरिक्तही येऊन गेले आहेत. विशेषत: त्र्यंबकेश्वर आणि त्यानंतर नाशिकरोड येथील अण्णा गणपती मंदिरातही त्यांनी भेट दिली होती.गेल्या दोन दिवसांत बॉलिवूडने दोन मोठे स्टार गमावले आहेत. इरफान खान यांच्या पाठोपाठ अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी (दि.३०) सकाळी निधन झाले. त्यामुळे चाहत्यांंना मोठा धक्का बसला. ऋषी कपूर यांच्या काळ जागवणारी आणि त्यांना चॉकलेट हिरो मानणारी एक पिढी आहे, त्या साऱ्यांनाच ऋषी कपूर यांचे जाणे धक्कादायक ठरले आहे. सकाळी या घटनेनंतर सोशल मीडियावर त्यांना अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, फाळके फिल्म सोसायटीचे मुनीराम अग्रवाल यांनी २००० मधील आठवण जागवली. नाशिक ही चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांची जन्मभूमी असल्याने नाशिकमध्ये आलेल्या प्रत्येकाला सोसायटीच्या वतीने फाळके यांची प्रतिमा भेट दिली जाते. ‘कुछ खट्टी कुछ मिठी’ या चित्रपटाच्या निमित्ताने ऋषी कपूर तसेच अभिनेते सुनील शेट्टी आणि काजोल हे नाशिकमधील तारांकित हॉटेलमध्ये उतरल्याचे कळल्यानंतर सोसायटीच्या वतीने त्यांना प्रतिमा देण्यात आली. यावेळी अंबडकर (स्व.) प्रकाश काळे आदी उपस्थित होते.ऋषी कपूर हे नाशिकनजीक असलेल्या शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येऊन गेले आहेत. तसेच सुमारे दीड वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये आले होते. त्यानंतर नाशिकरोड येथील श्री अण्णा गणपती नवग्रह सिद्ध पीठम येथे त्यांनी भेट दिली. येथील गणरायाच्या विशाल मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी येथील नवग्रह मंदिरात मंगळ ग्रहाची दोन तास पूजा केली होती, असे प. पू. अण्णा गुरुजी यांनी सांगितले.---------अभिनेता इरफान खान यांच्या निधनानंतर आज लगेचच ऋषी कपूर यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. बालवयात चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या ऋषी कपूर यांनी शेवटपर्यंत आपल्या अभिनयातून चित्रपट रसिकांची मने जिंकली. चित्रपटसृष्टीत कपूर घराण्याचे मोठे योगदान असून, ऋषी कपूर याच्या निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.- छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक

टॅग्स :Nashikनाशिक