कळवणला रंगली कुस्त्यांची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 10:03 PM2020-02-07T22:03:16+5:302020-02-08T00:08:52+5:30

श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवात पहिल्या दिवशी कुस्त्यांची दंगल रंगली. पहिल्याच दिवशी १२१ कुस्त्या झाल्या. श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवात कसमादे पट्ट्यातील आदिवासी बांधवांनी व परिसरातील हजारो विठ्ठलभक्तांनी विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन मनोभावे पूजा केली. कुस्ती दंगलीच्या पहिल्या दिवशी कै राजाराम पगार कुस्ती आखाड्यात तब्बल लहान मोठ्या १२१ कुस्त्या झाल्या. या दंगलीत २५० हून अधिक पहिलवानांनी सहभाग घेतला.त्यात मुलीनी आखाड्यात पाय ठेऊन कुस्त्या जिंकल्या.

Riot wrestling riots | कळवणला रंगली कुस्त्यांची दंगल

कळवण येथील श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सव निमित्ताने आयोजित कुस्ती दंगलीचे उदघाटनप्रसंगी आमदार नितीन पवार. समवेत कौतिक पगार, सुधाकर पगार, नितीन पगार, रविंद्र पगार,भावराव पगार ,जितेंद्र पगार, मोतीराम पगार आदी

Next
ठळक मुद्देविठोबा महाराज यात्रोत्सव : दोन दिवसात लाखोंची उलाढाल

कळवण : येथील श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवात पहिल्या दिवशी कुस्त्यांची दंगल रंगली. पहिल्याच दिवशी १२१ कुस्त्या झाल्या.
श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवात कसमादे पट्ट्यातील आदिवासी बांधवांनी व परिसरातील हजारो विठ्ठलभक्तांनी विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन मनोभावे पूजा केली. कुस्ती दंगलीच्या पहिल्या दिवशी कै राजाराम पगार कुस्ती आखाड्यात तब्बल लहान मोठ्या १२१ कुस्त्या झाल्या. या दंगलीत २५० हून अधिक पहिलवानांनी सहभाग घेतला.त्यात मुलीनी आखाड्यात पाय ठेऊन कुस्त्या जिंकल्या.
गेल्या दोन दिवसात कळवण शहरात लाखो रु पयांची उलाढाल झाली . कुस्ती दंगलीचे उदघाटन आमदार नितीन पवार यांच्या हस्ते, महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार डॉ राहुल आहेर, आमदार दिलीप बोरसे, मविप्रचे माजी संचालक रविंद्र देवरे, आनंद अग्रो ग्रुपचे संचालक उद्धव आहेर, धनंजय पवार , संजय देवरे, अ‍ॅड परशुराम पगार, सुधाकर पगार, हेमंत बोरसे, उपनगराध्यक्ष जयेश पगार , माजी सरपंच अजय मालपुरे, सचिन माने , नितीन पगार , राजेंद्र पगार रविंद्र पगार आदी मान्यवराच्या उपस्थित झाले.

लक्षवेधी लढत
जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती रवींद्र देवरे व उद्धव आहेर यांची प्रत्येकी अकरा हजार रु पयांची कुस्ती पहिल्या दिवशी लक्षवेधी ठरली. विठ्ठलभक्तांना व यात्रेकरु बांधवाना कुस्ती दंगलीत प्रेक्षणीय कुस्तीचे दर्शन झाले. येवला ,मनमाड ,भगुर ,नाशिक ,पुणे ,कोपरगाव ,सातारा ,सांगली ,मुंबई ,दिल्ली ,आदी ठिकाणच्या कुस्तीगिरांनी हजेरी लावली. १०१ रूपयांपासून ५००१ रूपयांपर्यंत रोख रकमेच्या तसेच आकर्षक भेट वस्तू देऊन कुस्त्या पार पडल्या.

Web Title: Riot wrestling riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.