शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर रिमझिम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 01:27 IST

नाशिक : शहर व परिसरासह रविवारी (दि.५) मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्री दोन वाजेपासून पहाटेपर्यंत शहरासह धरणक्षेत्रांतदेखील पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच सोमवारी (दि.६) सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४.३ मिमी इतका पाऊस शहरात मोजला गेला, तर मागील २४ तासांत १८ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली.

ठळक मुद्देहलक्या सरी : धरणक्षेत्रांत जोरदार हजेरी

शहरात बरसलेल्या पावसाने शरणपूर रस्त्यावर वाहनधारकांची तारांबळ उडाली.नाशिक : शहर व परिसरासह रविवारी (दि.५) मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्री दोन वाजेपासून पहाटेपर्यंत शहरासह धरणक्षेत्रांतदेखील पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच सोमवारी (दि.६) सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४.३ मिमी इतका पाऊस शहरात मोजला गेला, तर मागील २४ तासांत १८ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली.सोमवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ हवामान कायम होते. दिवसभर नाशिककरांना अवघे काही मिनिटेच सूर्यदर्शन घडले. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरींचा वर्षाव कायम राहिला. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही पावसाची रिपरिप नागरिकांनी अनुभवली. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले. तसेच रविवारी मध्यरात्रीपासूनच शहरात वाऱ्याचा वेग नेहमीपेक्षा अधिक वाढल्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा जाणवू लागला आहे. वारे वेगाने वाहू लागल्याने दिवसभर आकाशात ढगांची गर्दी अन् हलक्या सरींची हजेरी सुरू राहिली.मुंबईच्या समुद्रकिनाºयावर वाºयाचा वेग वाढला असून, दोन दिवसांपासून पाऊसही जोरदार सुरू आहे. यामुळे शहराच्या वातावरणावरही त्याचा प्रभाव दिसून येत आहे. पुढील दोन दिवस मुंबईत पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे. यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी सकाळी नाशिक तालुक्यासह त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या दोन्ही तालुक्यांत सोमवारी सकाळी अनुक्र मे ३८ व ६२ मिमी इतका पाऊस मोजला गेला. गंगापूर धरण समूहात झालेला पाऊस असागंगापूर धरण समूहातदेखील पावसाने मध्यरात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत जोरदार हजेरी लावली. गंगापूर-४० मिमी, अंबोली-४५ मिमी, कश्यपी-१५ मिमी, गौतमी-२९ मिमी इतका पाऊस पाणलोट क्षेत्रात मोजण्यात आला. यामुळे गंगापूर धरणात नव्याने ५१ दलघफू पाऊसपाण्याची आवक झाली.

टॅग्स :Rainपाऊस