शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
4
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
5
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
6
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
7
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
8
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
9
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
10
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
11
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
12
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
13
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
14
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
15
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
16
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
17
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
18
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
19
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
20
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांची प्रतिमा बदलण्यासाठी ‘रिक्षासारथी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:35 IST

नाशिक : प्रवाशांसोबत अरेरावी, बेशिस्तपणा, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे अशी रिक्षाचालकांची शहरवासीयांमध्ये प्रतिमा तयार झाली आहे़ मात्र, या व्यवसायामध्येही चांगल्या प्रवृत्तीचे रिक्षाचालक असून, रिक्षात राहिलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग, रोख रक्कम, शालेय प्रमाणपत्रे प्रामाणिकपणे परत करणारे रिक्षाचालकही शहरात बहुसंख्येने आहेत़ रिक्षाचालकांची प्रतिमा सुधारावी यासाठी शहर पोलीस व संक्रमण सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ...

नाशिक : प्रवाशांसोबत अरेरावी, बेशिस्तपणा, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे अशी रिक्षाचालकांची शहरवासीयांमध्ये प्रतिमा तयार झाली आहे़ मात्र, या व्यवसायामध्येही चांगल्या प्रवृत्तीचे रिक्षाचालक असून, रिक्षात राहिलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग, रोख रक्कम, शालेय प्रमाणपत्रे प्रामाणिकपणे परत करणारे रिक्षाचालकही शहरात बहुसंख्येने आहेत़ रिक्षाचालकांची प्रतिमा सुधारावी यासाठी शहर पोलीस व संक्रमण सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ‘रिक्षासारथी - आदर्श रिक्षाचालक नाशिकची ओळख’ ही नवीन संकल्पना सुरू केली असून त्याचा शुभारंभ मंगळवारी (दि़३१) करण्यात आला़  शहर पोलीस मुख्यालयातील बॅरेक क्र. १७ मध्ये झालेल्या या कार्यक्रमात रविवार कारंजा परिसरातील ४० रिक्षाचालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली़ प्रवाशांसोबत चांगली वर्तणूक ठेवणारे, कागदपत्रे सोबत ठेवणाऱ्या रिक्षाचालकांची खात्री करून शहरातील चौदा रिक्षाचालकांना आदर्श रिक्षाचालक म्हणून गौरविण्यात आले़ यावेळी संक्रमण जनशक्ती मंच व पोलीस आयुक्तालयातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात दहा रिक्षाचालकांना ‘रिक्षासारथी’च्या फलकाचे वाटप करण्यात आले. तर डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी ‘मी आहे  आदर्श रिक्षाचालक’ याची शपथ प्रतिज्ञापत्र वाचून रिक्षाचालकांना दिली.  यावेळी उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त डॉ. अजय देवरे, भागवत सोनवणे, पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार, फुलदास भोये, संमोहनतज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड, संक्रमण जनशक्ती मंचचे मंदार ओलतीकर, माईंड ट्रिक्स एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे राहुल रायकर, डॉ. स्वप्निल देवरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यांनी केले.प्रामाणिक रिक्षाचालकांचा सन्मानरिक्षासारथी ही संकल्पना राबविल्याने प्रवाशांमध्ये रिक्षाचालकांविषयीचा विश्वास निर्माण होऊन त्यांच्यात एकप्रकारे ऋणानुबंध निर्माण होतील अशी अपेक्षा सहायक आयुक्त डॉ. देवरे यांनी व्यक्त केली. रिक्षाचालक नाना हिरे, विजय पवार, किशोर खरताळे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात बोलताना, रिक्षाचालकांविषयी समाजात गैरसमज आहेत. त्यास कारणीभूत आमच्यातीलच काही अप्रामाणिक रिक्षाचालक असून ज्यामुळे रिक्षाचालक बदनाम झाला आहे. परंतु प्रवाशांना सेवा देताना कायद्याचेही पालन झाले पाहिजे अशा प्रामाणिक रिक्षाचालकांचा सन्मान होणे ही बाब अभिमानाची असल्याचे म्हणाले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय