लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : परिसरात सध्या भात पिकाच्या आवणीला वेग आला असून, बळीराजाला जसा हवा तसा पाऊस वरुणराजाच्या कृपेने पडत आहे. यंदा पाऊसदेखील मेहेरबान झाला आहे.तालुक्यात भातपीक मुख्य आहे. या पिकाच्या विविध जाती त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात विकसित केलेल्या आहेत. त्यामुळेच त्र्यंबकला भातपिकाची दरवर्षापेक्षा यावर्षी जास्त प्रमाणात केली आहे. यावर्षी पाऊसदेखील समाधानकारक आहे. आतापर्यंत ८९९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या भात, नागली, खुरासणी, वरई, भुईमूग, सोयाबीन आदींसह तूर, मका या खरीप पिकांची लागवड तालुक्यात करण्यात आली आहे.सध्या सर्वत्र भात खणणी, भात आवणीला (लावणी) वेग आला आहे. दिवसाची रोजंदारी रु . २००, २२५ व २५०पर्यंत आहे. काही ठिकाणी दुपारची भाकरीदेखील दिली जाते. शेतकऱ्यांच्या निकडीनुसार रोजंदारी दिली जात असते.सध्याचे युग यांत्रिकी असून, ट्रॅक्टरच्या साहाय्याने गाळ वगैरे केला जातो. त्यामुळे कामांच्या लवकर आटोपते. जोपर्यंत पावसाचे सातत्य आहे तोपर्यंत ज्या त्या शेतकऱ्यांना आपल्या शेतीची कामे आटोपण्याची घाई असते म्हणूनच सध्या तरी सर्वांचीच लगबग सुरू आहे.
भात आवणीला वेग !
By admin | Updated: July 4, 2017 23:44 IST