शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

भातशेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:07 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यात सर्वत्र शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे तालुक्यातील धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीपर्यंत गेल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भाम, भावली, दारणा, वाकी खापरी धरण परिसरात जाण्यासाठी पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. धोकादायक पुलांवरून वाहतूक थांबविण्यात आली असून, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सतर्कत राहण्यास सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देइगतपुरीत संततधार। धरणे ओव्हरफ्लो; पर्यटकांना धरण क्षेत्रात जाण्यास मज्जाव

घोटी : इगतपुरी तालुक्यात सर्वत्र शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे तालुक्यातील धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीपर्यंत गेल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भाम, भावली, दारणा, वाकी खापरी धरण परिसरात जाण्यासाठी पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. धोकादायक पुलांवरून वाहतूक थांबविण्यात आली असून, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सतर्कत राहण्यास सांगण्यात आले आहे.भाताच्या जमिनीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने शेतांना नद्यांचे स्वरूप आले आहे. भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी गोंदे दुमालाचे सरपंच गणपत जाधव यांनी केली आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि पोलिसांना सूक्ष्म लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. तहसीलदार वंदना खरमाळे-मांडगे यांच्या देखरेखीखाली तालुक्यातील घटनांवर लक्ष ठेवले जात आहे.तालुक्यात १२ तासांत २२१ मिमी पाऊस पडला असून, संततधार सुरूच आहे. आतापर्यंत पडलेल्या ३०५२ मिमी पावसाने नद्या-नाले, धरणे भरली आहेत. शनिवारअखेर ९१.७९ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. कोणत्याही क्षणी इगतपुरी तालुक्यात पाऊस शंभरी गाठण्याची शक्यता आहे. परिणामी जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे.अनेक रस्त्यांवरील पुलांवरपाणी आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणाकडे जाणाºया मार्गावरील वाहतूक आणि पर्यटकांची वाहने पोलिसांकडून वळविण्यात आली आहे. पावसाने झोडपून काढल्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणीसाचून राहिले आहे. काहीठिकाणी झाडे पडल्याचे समजते. अतिपावसामुळे रस्त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे.अपर वैतरणा ओव्हरफ्लोमुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्त्वाचे अपर वैतरणा धरण शनिवारी ओव्हरफ्लो झाले. धरणाचे पाचही दरवाजे तीन फुटाने उघडण्यात आले असून, ९२०० क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईकरांना अपर वैतरणा धरण भरल्यामुळे दिलासा मिळाला असून, मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटणार आहे.पाणी वाहत असल्यास वाहने पाण्यात घालू नये. पर्यटकांना वाहत्या पाणी परिसरात बंदी करण्यात आली आहे. विजेच्या खांबांना आणि उपकरणांना स्पर्श करू नये. धुक्यात वाहनांचे लाइट आणि इंडिकेटर सुरू करावे. आपत्कालीन प्रसंगासाठी तालुका प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाची मदत घ्यावी.- वंदना खरमाळे-मांडगे,तहसीलदार, इगतपुरी