वणी : प्रसंगाधवनामुळे अनर्थ टळला वणी: कळवणच्या उपजिल्हा रु ग्णालयातुन नाशिकला रु ग्णाला उपचारासाठी घेउन जाणाऱ्या रु ग्णवाहीकेने दिंडोरी परिसरात अचानक पेट घेतला. सतर्कतेमुळे दुर्घटना टळली. कळवण उपजिल्हा रु ग्णालयात संतोषआनंदा अहीरे (५०)हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी दाखल होते. उपचारा दरम्यान प्रकृती बिघडल्याने त्यांना नाशिकच्या जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यावेळी उपजिल्हा रु ग्णालयाची रु ग्णवाहीका उपलब्ध नसल्याने वणी येथील भारत विकास योजनेच्या १०८ या रु ग्णवाहीकेला रु ग्ण घेऊन जाणेबाबत सुचीत करण्यात आले. एमएच१४सीएल ०८१४ या क्र मांकाची रु ग्णवाहीका कळवणला पाठविण्यात आली. तेथुन संतोष अहिरे त्यांचे पाच नातेवाईक डॉक्टर प्रकाश देशमुख वाहनचालक राजेश परदेशी हे सर्व नाशिकला रु ग्णवाहीकेतुन जात होते. दिंडोरी पासुन सुमारे चार कीलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोलपंप परीसरात बोनेटमधुन धुर निघत असल्याचे डॉक्टर प्रकाश देशमुख यांच्या लक्षात आले.त्यांनी तात्काळ वाहन चालक राजेश परदेशी यांना वाहन रस्त्याच्या कडेला थांबविण्यास सांगीतले वाहन थांबवुन प्रथमत: रु ग्ण व नातेवाईक यांना बाहेर काढण्यात आले.तोपर्यंत रूग्णवाहीकेने पेट घेतला रु ग्णवाहीकेतील अग्नीशमन प्रतीबंध उपकरणाने व पेट्रोलपंप वरील उपकरणाने प्रकाश देशमुख व राजेश परदेशी यांनी आग विझविली. यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान नांदुरीच्या रु ग्णवाहीकेला बोलावुन रु ग्ण व नातेवाईकांना नाशिकला हलविण्यात आले. अति ऊष्णतामानामुळे तांत्रिक बिघाङ होऊन रु ग्णवाहीकेने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
रु ग्णवाहिकेने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:52 IST
वणी : प्रसंगाधवनामुळे अनर्थ टळला वणी: कळवणच्या उपजिल्हा रु ग्णालयातुन नाशिकला रु ग्णाला उपचारासाठी घेउन जाणाऱ्या रु ग्णवाहीकेने दिंडोरी परिसरात अचानक पेट घेतला. सतर्कतेमुळे दुर्घटना टळली.
रु ग्णवाहिकेने घेतला पेट
ठळक मुद्देऊष्णतामानामुळे तांत्रिक बिघाङ होऊन रु ग्णवाहीकेने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज