नाशिकरोड : गांधीनगर जनता विद्यालयात स्टुडंट फेस्टिवल स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात पार पडले.स्टुडंट फेस्टिवलमध्ये निबंध, वर्क्तृत्व, साडी डे, टाय डे, चित्रकला, सोलो नृत्य, समूहनृत्य आदि स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर नगरसेवक राहुल दिवे, मेघा साळवे, मुख्याध्यापक सुरेंद्र बच्छाव, एम.पी. निकम, गुलाब भामरे, लता कांबळे, आर.के. देवरे, मीना आडके, एस. एल. जाधव आदि मान्यवर उपस्थित होते. स्टुडंट फेस्टिव्हलमध्ये साडी डे स्पर्धेतील विजेते- मुस्कान पठाण, रितिका जाधव, टाय-डे - रोहन खैरनार, कुणाल गरुड, निबंध स्पर्धा - रितू माळी, ऋतुजा गरड, चित्रकला - स्नेहल गायकवाड, वर्क्तृत्व- राजरत्न पवार, रितू माळी, अमितकुमार विश्वकर्मा, सोलो डान्स - प्रमोद कनोजिया, श्वेता भोळे, कोमल गायकवाड, समूहनृत्य- गायत्री कुलथे, पूजा बोधले आदिंना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत अभिनव बाल मंदिर, जनता विद्यालय, मनपा शाळा क्र. ४७, न्यू दारणा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनीदेखील सहभाग घेतला होता. सूत्रसंचालन एस. एस. कटाळे यांनी केले. (प्रतिनिधी)
जनता विद्यालयात बक्षीस वितरण
By admin | Updated: February 6, 2016 22:52 IST