शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा पंचायत समितीत आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:38 IST

विकासकामांची अंमलबजावणी करताना अधिकारी व कर्मचारी वर्गाने स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच कामे करावीत, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित यांनी केले.

ठळक मुद्देविकासकामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याचे आवाहन

सटाणा : विकासकामांची अंमलबजावणी करताना अधिकारी व कर्मचारी वर्गाने स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच कामे करावीत, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित यांनी केले.येथील पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच अधिकारी व ग्रामसेवक कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत उपाध्यक्ष गावित अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाकडून विकासकामे करताना सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या उपस्थितीत कामांचा शुभारंभ करूनच कामे सुरू करावीत कारण त्यांचा तो अधिकार आहे, असे त्या म्हणाल्या. बांधकाम, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, कृषी, समाज कल्याण, महिला व बाल कल्याण या सर्व विभागांचा स्वतंत्र आढावा घेऊन गावित यांनी योग्य सूचना केल्या. या सर्व विभागातील कामकाजाबाबत लोकप्रतिनिधींना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाºया बिरसा मुंडा कृषिक्र ांती विकास योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना यातील ब्राह्मणगाव गटातील लाभार्थींना विहीर मंजुरीचे प्रशासकीय आदेश प्रदान करण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावरील ५ टक्के पेसा,१४ वा वित्ता आयोगांतर्गत कामे चांगल्या प्रतीचे करावीत, याकामी गटविकास अधिकारी यांनी लक्ष घालावे तसेच बिजोरसे येथील ग्रामसेवक यांच्या बाबतच्या तक्र ारी त्वरित निकाली काढाव्यात, अशी सूचना गावित यांनी केली.बैठकीत पंचायत समिती सभापती विमल सोनवणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव,जिल्हा परिषद सदस्य लता बच्छाव, साधना गवळी, कान्हू गायकवाड, यशवंत पवार, पंचायत समिती सदस्य रामदास सूर्यवंशी, वसंत पवार, दिलीप अहिरे, संजय जोपळे, जिभाऊ कोर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. डी. गर्गे, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, बांधकाम उपअभियंता सी. पी. खैरनार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अनिस खान, शाखा अभियंता अशोक शिंदे, खैरनार, चौरे, हिरे, विस्तार अधिकारी व्ही. पी. जाधव, रामकृष्ण खैरनार, कृषी अधिकारी हिरे, पवार, नेरकर, बालविकास प्रकल्प अधिकारी देसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ. अहिरराव उपस्थित होते. सहायक गटविकास अधिकारी नितीन देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Nashikनाशिकpanchayat samitiपंचायत समिती