शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी नगरपरिषदेत विविध प्रलंबीत विकास कामांबाबत आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 18:36 IST

इगतपुरी : तालुक्यातील नागरी सुविधा व प्रलंबित विविध विकास कामांच्या बाबतीत नगरपरिषदेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विकास कामांची माहिती संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच कुठल्याही कामात हलगर्जीपणा होता कामा नये, जास्तीच जास्त विकास कामे झाली पाहिजे, कामे त्वरित व्हावी आणि इगतपुरी शहराचा विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करू या अश्या सूचना आमदार हिरामण खोसकर यांनी केल्या.

ठळक मुद्देकेवळ पाच नगरसेवकांनी उपस्थिती दर्शविल्याने नाराजी

इगतपुरी : तालुक्यातील नागरी सुविधा व प्रलंबित विविध विकास कामांच्या बाबतीत नगरपरिषदेत आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीत विविध विकास कामांची माहिती संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच कुठल्याही कामात हलगर्जीपणा होता कामा नये, जास्तीच जास्त विकास कामे झाली पाहिजे, कामे त्वरित व्हावी आणि इगतपुरी शहराचा विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करू या अश्या सूचना आमदार हिरामण खोसकर यांनी केल्या.यावेळी १९ नगरसेवकांपैकी केवळ पाच नगरसेवकांनी उपस्थिती दर्शविल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. नगरविकास विभागाकडे मोठ्या प्रमाणात नगरपरिषदेचा विकास निधी थकीत असेल तर नगरविकास मंत्री व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याकडे या बाबत मागणी करण्याचे ठरविण्यात आले.शहरात विकासाअभावी लोकसंख्या कमी होण्याचे प्रमाण वाढत असुन दुसरीकडे पर्यटनाचा ओघ वाढत आहे. यात शासनाचा विविध विकास कामांचा निधी केवळ केलेल्या जुन्या कामांच्या डागडूजीत खर्च करून शहराचा विकास कसा साधणार यावरही चर्चा करण्यात आली.दरम्यान या बैठकीत एकुण २८ विषयांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले.. यावेळी नगरसेवक सुनिल रोकडे, संपत डावखर, किशोर बगाड, युवराज भोंडवे, विनोद कुलथे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे, शहराध्यक्ष वसीम सैयद, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संतोष सोनवणे, माजी नगरसेवक मिलिंद हिरे, नियाज खलीफा तसेच नगरपरिषदेचे सर्व विभागीय प्रमुख उपस्थित होते.प्रतिक्रीया ...अल्पसंख्याक घटकांच्या विकासाची अनेक कामे करण्याचा ठराव व प्रस्ताव शासनाकडे दिला असुन निधीही आहे. मात्र जिल्हा प्रशासन प्रस्ताव मंजुर करत नसुन निधीही नगरपरिषदेकडे पाठवीत नसल्याने बहुतांशी कामे रेंगाळली आहेत. ही कामे पुर्ण होण्यास सहकार्य करावे.- नईम खान, उपनगराध्यक्ष, इगतपुरी.शासनाकडुन येणारा विकास निधी अपुरा असुन उर्वरीत व थकीत निधी मिळाल्यास शहरातील प्रलंबीत कामे पुर्णत्वाला जाणे सोपे होईल. या करीता शासनाकडील थकीत निधी बाबत आमदार खोसकर यांनी नगरपरिषदेला वेळोवेळी सहकार्य करावे.- निर्मला गायकवाड-पेखळे, मुख्याधिकारी, इगतपुरी. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRural Developmentग्रामीण विकास