शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी योजनांचा सभापतींकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:11 IST

जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विकासासाठी सेसमधून करण्यात आलेल्या निधी खर्चाचे नियोजन करून अधिकाऱ्यांनी मार्चअखेर निधी शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना सभापती संजय बनकर यांनी केली. पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीची बैठक सभापती संजय बनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात प्रामुख्याने सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा तालुकानिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : निधी वेळेत खर्च करण्याच्या सूचना

नाशिक : जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विकासासाठी सेसमधून करण्यात आलेल्या निधी खर्चाचे नियोजन करून अधिकाऱ्यांनी मार्चअखेर निधी शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना सभापती संजय बनकर यांनी केली.पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीची बैठक सभापती संजय बनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात प्रामुख्याने सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा तालुकानिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. सदर योजनांसाठी प्राप्त झालेला निधी माहे मार्च २०२० अखेरपर्यंत १०० टक्के खर्च करण्याबाबत नियोजन करून तशी कार्यवाही करण्याबाबत सभापतींनी सूचना दिल्या आहेत. तर कृषी समितीच्या सभेतही सभापती बनकर यांनी जिल्हा परिषद सेस निधीअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा तालुकानिहाय सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर अनुदानाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या इतर विविध विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती घेण्यात आली. कृषी समितीच्या यापुढील बैठकांना सर्व कृषी विस्तार अधिकारी आणि अधिकारी यांनी उपस्थित राहून आढावा देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :zpजिल्हा परिषद