शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

व्यापारी संकुलांना महसूल खात्याच्या नोटिसा

By admin | Updated: March 5, 2017 01:18 IST

नाशिक : घरगुती वापरासाठी बांधकामाची अनुमती घेऊन त्याचा व्यावसायिक वापर करणाऱ्या निवासस्थानांची माहिती गोळा करून तहसील कार्यालयाने सव्वाशेहून अधिक जागा मालकांना दंडाच्या नोटिसा बजावल्या

 नाशिक : शहरातील मध्यवस्तीत घरगुती वापरासाठी बांधकामाची अनुमती घेऊन नंतर त्याचा व्यावसायिक वापर करणाऱ्या कमर्शियल कॉम्प्लेक्स, खासगी इमारती, निवासस्थानांची माहिती गोळा करून नाशिक तहसील कार्यालयाने सुमारे सव्वाशेहून अधिक जागा मालकांना दंडाच्या नोटिसा बजावल्या असून, मध्यवस्तीत झालेल्या या कारवाईने मिळकतधारकांची धावपळ उडाली. येत्या आठवडाभरात बिनशेती कराचा भरणा न केल्यास सदर मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार महसूल खात्याने राखून ठेवला आहे. शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड, शरणपूररोड, कॅनडा कॉर्नर, रामदास कॉलनी, महात्मानगर, एबीबी सर्कल हा भाग रहिवासक्षेत्रापेक्षा व्यावसायिक अंगाने मोठ्या प्रमाणावर विकसित झाला असून, बहुमजली कमर्शियल कॉम्प्लेक्स ठिकठिकाणी उभे राहिले आहेत, तर काही रहिवास इमारतींमध्येच कार्यालये, दुकाने, व्यवसाय थाटण्यात आले आहेत. ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता, अनेकांनी या भागातील आपला रहिवास अन्यत्र हलवून उपलब्ध जागेचा वापर वाणिज्य वापरासाठी सुरू केला आहे. तथापि, रहिवास क्षेत्रासाठी बांधकामाची अनुमती घेऊन त्याचा वापर वाणिज्य, व्यवसायासाठी करणे हा जमीन महसूल अधिनियमाचा भंग असल्याची बाब नाशिक तहसीलदार डॉ. राजश्री अहिरराव यांच्या निदर्शनास आल्याने तलाठ्यांच्या दहा पथकाने एबीबी सर्कल येथून पाहणी मोहीम हाती घेतली. या पाहणीत मध्यवस्तीत जवळपास सव्वाशे अशी ठिकाणे आढळली की, ज्यांनी रहिवाससाठी बांधकाम अनुमती घेतली व त्याचा वाणिज्य वापर केला. हे करत असताना बिनशेती कराचा भरणा अथवा बिनशेतीची अनुमती त्यांनी घेतलेली नाही. अशा मालमत्ताधारकांना ते वापरत असलेल्या वर्षापासून दंडाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. येत्या आठवड्यात संबंधितांनी दंडाची रक्कम न भरल्यास त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची तयारी महसूल खात्याने चालविली आहे. मध्यवस्तीतील ही कारवाई शहरातील अन्य भागातही लवकरच राबविली जाणार असल्याची माहिती डॉ. अहिरराव यांनी दिली.