शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने पांढरे सोनेही काळवंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 00:09 IST

सायगाव : गेल्या चार महिन्यांपासुन सतत कोसळणाऱ्या पावसाने खरिप हंगामातील सर्वच पिकांची धुळधाण केली. परतीच्या पावसाने वेचणीला आलेल्या कापसालाही सोडले नाही. लाल्या, करपा रोगाने कापुस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यात पावसाची भर पडल्याने यंदा पांढरे सोनेही काळवंडले आहे.

ठळक मुद्देयंदा चाळीस टक्क्याने घटला कपाशीचा पेरा

सायगाव : गेल्या चार महिन्यांपासुन सतत कोसळणाऱ्या पावसाने खरिप हंगामातील सर्वच पिकांची धुळधाण केली. परतीच्या पावसाने वेचणीला आलेल्या कापसालाही सोडले नाही. लाल्या, करपा रोगाने कापुस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यात पावसाची भर पडल्याने यंदा पांढरे सोनेही काळवंडले आहे.मागील वर्षी तालुक्यात १७ हजार हेक्टरवर कपाशी पिकाची लागवड करण्यात आली होती. गतवर्षी कांदा पिकाला मिळालेले चांगले बाजार भाव व करोनामुळे कापुस वेचणीसाठी परराज्यातील मजुर येतील का ? यामुळे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशीपिकाचा पेरा ४० टक्क्याने कमी केला. या वर्षी तालुक्यात केवळ ९ हजार ३७८ हेक्टर क्षेत्रात कपाशीपिकाची लागवड करण्यात आली आहे.सततच्या पावसाने खरीप हंगामातील बाजरी, सोयाबिन, मका, मुग, भुईमुग आदी पिकांची नासाडी झाली. उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले. त्यातच बाजार भावही नाही. त्यामुळे शेतकरी अस्मानी -सुलतानी संकटाने बेजार झाला आहे. तालुक्यात कापुस वेचणीच्या हंगामाला सुरूवात होताच परतीच्या पावसाने झोडपल्याने कापसाची प्रत खराब झाली आहे. गावागावात खाजगी व्यापाऱ्यांनी कापुस खरेदी सुरु केली आहे.राज्य शासनाने कापसाला ५८२५ रुपये प्रति क्विंटलला हमीभाव जाहिर केला आहे. मात्र खाजगी व्यापारी केवळ ३८०० ते ४२०० रूपये प्रति क्विंटल दराने कापुस खरेदी करत आहे. रेन टच च्या नावाखाली शेतकऱ्यांची लुट होत आहे.पूर्व मशागती पासुन ते वेचणीपर्यंत कपाशीपिकाला एकरी ३० हजार रूपये खर्च येतो. यंदाच्या अती पावसाने आलेल्या करपा व लाल्या रोगामुळे उत्पादन निम्म्याने घटले आहे. केवळ ऐकरी सरासरी ४ ते ७ क्विंटल पर्यंत उत्पादन पदरात पडणार आहे. उत्पादन खर्च व मिळणारे उत्पन्न यांचा लेखाजोखा बघता शेतकऱ्यांच्या पदरी ढब्बु ही शिल्लक राहाणार नसल्याचेच चित्र आहे.यंदाच्या हंगामात परतीच्या पावसाने, करप्या व लाल्या रोगामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रूपयांचे अर्थसहाय्य द्यावे. उत्पादन घटल्याने बाजार भावतेजीत राहतील, अशी अपेक्षा होती, ती फोल ठरत आहे.- पोपट उशीर, कापूस उत्पादक शेतकरी, सायगाव 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी